fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

5 reasons of sunrisers hyderabad lost against rcb in 3rd match of ipl

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली। आयपीएलच्या 13 व्या हंगामातील तिसर्‍या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने सनरायझर्स हैद्राबाद संघाला 10 धावांनी पराभूत केले. आरसीबीने हा सामना आपल्या चांगल्या गोलंदाजीमुळे जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने हैद्राबादला 20 षटकांत 164 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना हैद्राबाद संघाचा डाव 19.4 षटकांत 153 धावांत संपला.

या लेखात आपण या सामन्यात हैद्राबादच्या पराभवाची 5 मोठी कारणे जाणून घेणार आहोत.

देवदत्त पडिक्कल याला दिले दोन जीवदान

विशेष म्हणजे सनरायझर्स हैद्राबाद संघाने सामन्याच्या सुरूवातीस आरसीबीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला दोन जीवदान दिले. आधी हैद्राबाद संघाचा फिरकीपटू राशिद खान आणि त्यानंतर युवा अष्टपैलू अभिषेक शर्माने पडिक्कलचा झेल सोडला. त्यानंतर पडिक्कलने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच म्हणजेच पदार्पणाच्या सामन्यात 42 चेंडूंत 56 धावांची शानदार खेळी केली. ज्यामुळे आरसीबी संघाने 163 धावा केल्या.

मिशेल मार्शला झाली दुखापत

नुकताच इंग्लंडविरुद्ध शानदार खेळ दाखविणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श या सामन्यात जखमी झाला. हैद्राबाद संघाच्या डावाच्या सुरूवातीला गोलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली. दुखापत इतकी मोठी होती की त्याला आपले षटकही पूर्ण करता आले नाही. तो सामन्याच्या शेवटच्या क्षणी फलंदाजीस आला. नंतर पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

पॉवरप्लेमध्ये एकही गडी केला नाही बाद

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला. आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादच्या गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये चांगलेच ठोकून काढले. हैद्राबादच्या गोलंदाजांनी एकही गडी बाद न करता पहिल्या 6 षटकांत 53 धावा दिल्या.

संघ चांगल्या स्थितीत असतांना बेयरस्टो झाला बाद

आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) विरुद्ध झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघ सामन्यात आघाडीवर होता. पण त्यानंतर हैद्राबादच्या डावाच्या 15.2 षटकांत सर्वोत्कृष्ट खेळ दाखवणारा फलंदाज जॉनी बेयरस्टो फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या चेंडूवर 61 धावांवर बाद झाला. चहलच्या पुढच्या चेंडूवर तर विजय शंकरही त्रिफळाचित झाला. या दोन बळीनंतर हैद्राबाद संघ पुन्हा सामन्यात परतू शकला नाही.

डेथ ओव्हर्समध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचे फलंदाज झाले बाद

सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) संघाला शेवटच्या षटकात जास्त धावांची आवश्यकता नव्हती. बेयरस्टो आणि शंकरच्या विकेट्स असूनही, संघाला 18 चेंडूत 29 धावांची गरज होती आणि 3 बळी शिल्लक होते. परंतु त्यानंतर हैदराबादचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले आणि अखेर संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. याचा परिणाम असा झाला की हैद्राबाद संघ आरसीबीसमोर 153 धावांवर बाद झाला आणि सामना 10 धावांनी गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-किंग्ज इलेव्हन पंजाबने एखादा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता…?

-चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात ‘या’ दोन भावात होईल टक्कर

-‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Next Post

आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

असा फॅन कधी पाहिलाही नसेल! टीव्हीसमोरच 'या' खेळाडूची केली आरती

कोहलीला बाद करणे क्रिकेटरच्या पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.