Loading...

कोण आहे तो गोलंदाज ज्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

पुणे। आजपासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे सुरु झाला आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. हा विराटचा कर्णधार म्हणून 50 वा कसोटी सामना आहे.

Loading...

तो 50 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा केवळ दुसराच कर्णधार आहे.

विराटने जानेवारी 2014 पासून भारतीय संघाचे नियमित कसोटी कर्णधारपद सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताकडून फिरकी गोलंदाज आर अश्विनने कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Loading...
Loading...

अश्विनने विराटच्या नेतृत्वाखाली कसोटीत खेळताना 227 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ रविंद्र जडेजा असून त्याने विराटच्या नेतृत्वाखाली 149 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

227 विकेट्स – आर अश्विन

149 विकेट्स – रविंद्र जडेजा

120 विकेट्स – मोहम्मद शमी

Loading...
You might also like