fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज

6 Indian Bowlers With Most Economy Rate In An Inning Of IPL

क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयपीएलसारख्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या सरासरी आणि स्ट्राईक रेटपेक्षा त्यांच्या इकोनॉमी रेटला अधिक महत्त्व दिले जाते. गोलंदाजाचा इकोनॉमी रेट म्हणजे गोलंदाजाने सरासरी प्रत्येक षटकात दिलेल्या धावा होय. याचा अर्थ जो गोलंदाज कमीत कमी कमी धावा देतो, तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज असे समजले जाते. कारण, त्या गोलंदाजाच्या काही अनमोल षटकांमुळे हातातून निसटणारा सामनाही जिंकण्याच्या शक्यता वाढतात.

आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकाच्या शॉन पोलॉकचा इकोनॉमी रेट हा सर्वोत्कृष्ट आहे. त्याने आयपीएलमध्ये जवळपास ४६ षटके टाकत ३०१ धावा दिल्या. त्यानुसार त्याचा इकोनॉमी रेट हा ६.५४ इतका आहे. तर अनिल कुंबळे हा त्याच्या ६.५७ या इकोनॉमी रेटमुळे आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेट असणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

या लेखात आपण, अशाच काही भारतीय गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या एका सामन्यात ४ किफायतशीर षटके टाकत उत्कृष्ट इकोनॉमी रेट नोंदवला आहे. 6 Indian Bowlers With Most Economy Rate In An Inning Of IPL

६. प्रविण कुमार: ४-०-८-० (इकोनॉमी रेट – २.००)

प्रविण कुमार हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने २ मे २०१२ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करत फक्त ८ धावा दिल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने ४ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार डेव्हिड हसीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रविणच्या षटकापासून सामन्याची सुरुवात झाली होती. या दमदार गोलंदाजाने सामन्यात ४ षटके टाकत ख्रिस गेल, विराट कोहलीसारख्या फलंदाजांना एकही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याची संधी दिली नाही. जरी त्याला त्या सामन्यात एकही विकेट घेता आली नसली, तरी त्याच्या गोलंदाजीने किंग्स इलेव्हन पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.

५. कर्ण शर्मा: ४-१-८-० (इकोनॉमी रेट – २.००)

कर्ण शर्मा हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. या गोलंदाजाने देखील प्रविण कुमारप्रमाणे एका सामन्यात ४ षटके टाकत ८ धावा दिल्या होत्या. २५ एप्रिल २०१३मध्ये चेन्नई येथे झालेल्या चेन्नई सिपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा कारनामा केला होता.

यावेळी सनराइजर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स हैद्राबादच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना शर्माने आपले पहिले षटक टाकत फक्त २ धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या शर्माच्या दुसऱ्या षटकात सुरेश रैना आणि एमएस धोनी यांसारख्या फलंदाजांनाही फक्त २ धावा करता आल्या होत्या. पुढे आपली २ षटके टाकत शर्माने फक्त ४ धावा दिल्या. अशा प्रकारे शर्माच्या ४ षटकात चेन्नईचे फलंदाज दबावात आले होते. एव्हाना शर्माच्या उत्कृष्ट कामगिरीव्यतिरिक्त सनराईजर्स हैद्राबादने तो सामना ५ विकेट्सने गमावला होता.

४. अमित मिश्रा: ४-०-८-२ (इकोनॉमी रेट – २.००)

अमित मिश्रा हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. हरियाणाच्या या फिरकी गोलंदाजाने १७ मे २०१३ला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ४ षटकात ८ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे सनराइजर्स हैद्राबादने २३ धावांनी तो सामना जिंकला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत सनराइजर्स हैद्राबादने २० षटकात ९ बाद १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्स हैद्राबादच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मिश्राने त्याच्या पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या होत्या. याच षटकात त्याने राहुल द्रविडची पहिली विकेट घेतली होती. पुढे प्रत्येक षटकात २ धावा त्याने फक्त २-२ धावा दिल्या. यात तिसऱ्या षटकातील त्याच्या संजू सॅमसनच्या विकेटचा समावेश होता.

3. राहुल शर्मा: ४-०-७-२ (इकोनॉमी रेट – १.७५)

राहुल शर्मा हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ मे २०११ला मुंबई इंडियन्सविरुद्दच्या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करत फक्त ७ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या.

पुणे वॉरियर्सचा कर्णधार युवराज सिंगने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी राहुलने सामन्यातील ७वे आणि त्याचे पहिले षटक टाकत केवळ २ धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात ३ धावा देत त्याने मुंबई इंडियन्सचा रन रेट बिघडवला होता. पुढे युवराजने राहुलला सामन्यातील १५वे षटक टाकण्यासाठी दिले होते. त्यावेळी मुंबईने ३ बाद ९६ धावा केल्या होत्या. म्हणून राहुलने आक्रमक गोलंदाजी करत रोहित शर्माची विकेट घेतली आणि त्या षटकात फक्त १ धाव दिली. त्यानंतचर पुढील षटकातच राहुलने तिरुमलसेट्टी सुमनला बाद करत आपली दुसरी विकेट घेतली.

जरी पुणे वॉरियर्सने तो सामना २१ धावांनी गमावला असला. तरी राहुलच्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले होते.

३. युजवेंद्र चहल: ४-१-६-१ (इकोनॉमी रेट – १.५०)

युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २३ मार्च २०१९मधील चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ६ धावा देत १ विकेट घेतली होती. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला फक्त ७१ धावांचे आव्हान दिले होते.

त्यानंतर चहलच्या गोलंदाजीने चेन्नईच्या डावाच्या सुरुवात झाली होती. यावेळी पहिले निर्धाव षटक टाकत त्याने दमदार सुरुवात केली होती. पुढील षटकात २ तर तिसऱ्या षटकात ३ अशा धावा दिल्या होत्या. यात त्याच्या दुसऱ्या षटकातील शेन वॉटसनच्या विकेटचा समावेश होता. पुढे सामन्यातील १३वे आणि आपले चौथे षटक निर्धाव टाकत चहलने चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट संतुलित केला होता. मात्र, त्याच्या एवढ्या चांगल्या गोलंदाजीनंतरही कमी धावांच्या आव्हानामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तो सामना गमावला होता.

१. आशिष नेहरा: ४-१-६-१ (इकोनॉमी रेट – १.५०)

आशिष नेहरा हा आयपीएलच्या एका सामन्यात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेटने गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानेही चहलप्रमाणे एका सामन्यात ४ षटकात ६ धावा देत १ विकेट घेतली होती. हा करनामा त्याने १५ मे २००९ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध केला होता.

या सामन्यात नेहराच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२० धावा केल्या होत्या. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना नेहराने त्याच्या पहिल्या षटकात गोलंदाजी करत फक्त २ धावा दिल्या होत्या. तर, आपल्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने सनी सोहलची विकेट घतेली होती. जरी दिल्ली डेअरडेविल्सने तो सामना त्या सामन्यात ४ विकेट्सने पराभूत झाली असली. तरी, नेहराची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.

ट्रेंडिंग लेख-

खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे…

क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा…

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

You might also like