Loading...

पीवायसी बुद्धिबळ लीग २०१९ स्पर्धेत एकूण ६३ खेळाडू सहभागी

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत 7 संघात 63 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथे दि.29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2109 या कालावधीत होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि तुषार नगरकर यांनी सांगितले की, पीवायसी हिंदू जिमखाना हा शहरांतील एकमेव क्लब आहे जो क्लबच्या सभासदांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि सर्व रॅकेट क्रीडा प्रकारात 6 अनोख्या लीग स्पर्धा आयोजित करतो.

ते पुढे म्हणाले की, या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल. या लीगमुळे सदस्यांना सर्वसाधारण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत वाडेश्वर विझार्डस, 7 नाईट्स, गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स, किंग्स 64, द बिशप्स चेक, मराठा वॉरियर्स, गोल्डन किंग हे 7 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

स्पर्धेसाठी 63 खेळाडूंचा समावेश असून हे खेळाडू सात संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील सहभागी संघांची यादी खालीलप्रमाणे – 

Loading...

वाडेश्वर विझार्डस – अक्षय साठ्ये, रोनित जोशी, कुणाल भुरट, अमोल मेहेंदळे, आशिष राठी, यशदूत देशपांडे, कौस्तुभ वाळिंबे, रामकृष्ण मेहेंदळे, अनुषा भिडे;

7 नाईट्स – निखिल चितळे, शुभांकर मेनन, माधुरी जाधव, सारंग उर्ध्वर्षे, आदित्य भट, तन्मय चितळे, बाळ कुलकर्णी, इंद्रनील मांडके, विजय देशपांडे;

Loading...

गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स – ईशान लागू, अमोद प्रधान, पराग चोपडा, रणजीत पांडे, अमृता देवगांवकर, अमेय कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, राजशेखर करमरकर, विजय ओगळे;

किंग्स 64 – जय केळकर, रोहीन लागू, राजन जोशी, अद्वैत जोशी, आदित्य लाखे, आकांश जैन, निरन भुरट, राघव बर्वे, शर्मिला शहा;

द बिशप्स चेक – आश्विन त्रिमल, किरण खरे, असिम देवगांवकर, चारू साठे, अभिषेक गोडबोले, अनघा भिडे, अथर्व भिडे, रौनक शहा, केतन देवल;

मराठा वॉरियर्स – यश मेहेंदळे, अमित धर्मा, परम जालन, राजेंद्र एरंडे, चंदन शहा, अथर्व हार्डीकर, मिहीर शहा, आदी जाधव, आशिष देसाई;

गोल्डन किंग – निरंजन गोडबोले, अजिंक्य जोशी, अर्णव कुंटे, हेमंत उर्ध्वर्षे, आदित्य ठक्कर, अभिषेक देशपांडे, तनिष्क गोरे, प्रियदर्शन डुंबरे, भक्ती ठक्कर.

You might also like
Loading...