रत्नागिरी जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन तसेच पी. एम. बने इंटरनॅशनल स्कुल यांच्या सहकार्याने सह्याद्रीनगर मित्र मंडळ आयोजित ६७ वी रत्नागिरी जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात येणार आहे.
सदर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दिनांक. ६, ७ व ८ डिसेंबर २०१९ या कालावधीत स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. पी. एम. बने इंटरनॅशनल स्कुल, सह्याद्री- साडवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार आहे.
उद्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रिशांक देवडीगा, विशाल माने तर बक्षिण वितरण सोहळ्याच्या प्रसंगी गिरीश एरणक हे दिगग्ज खेळाडु उपस्थित राहणार आहेत. त्याचा बरोबर अजिंक्य पवार, शुभम शिंदे, सतीश खांबे, स्वप्नील शिंदे व ललित घरत या प्रो कबड्डीतील खेळाडूंचा खेळ बघायला मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत तालुका असोसिएशनचे प्रत्येकी १ किंवा २ संघ सहभाग घेतील जवळपास पुरुषांचे १४ आणि महिलांचे ११ संघ सहभागी होतील. सदर स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळण्यात येतील. सदर स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी यजमान रत्नागिरी जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाईल.