दुसरा टी -२० सामना ३० ऑगस्ट रोजी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर येथे खेळला गेला, त्यात इंग्लंडने ५ गाड्यांनी विजय मिळविला. यासह इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला दिलेले १९६ धावांचे आव्हान डेव्हिड मलान(५४*) आणि ओएन मॉर्गन(६६) यांच्या अर्धशतकी खेळीच्या आणि जॉनी बेअरस्टोच्या आक्रमक ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर १९.१ षटकात सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला.
या सामन्यात मॉर्गनने अर्धशतक केल्याने एक खास विक्रमाला गवसणीही घातली आहे. मॉर्गनचे हे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२०मधील ९ वे अर्धशतक होते. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्यामध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या केन विलियम्सनची बरोबरी केली आहे. विलियम्सननेही कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९ अर्धशतके केली आहेत.
कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
९ -ओएन मॉर्गन ( ९ अर्धशतके)
९ -केन विल्यमसन – (९ अर्धशतके)
८-ऍरॉन फिंच – (१ शतक, ७ अर्धशतके)
८-विराट कोहली – (८ अर्धशतके)
८ -फॉफ डुप्लेसिस – (१ शतक, ७ अर्धशतके)
७-रोहित शर्मा – (२ शतके, ५ अर्धशतके)
असा झाला सामना
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानकडून अनुभवी मोहम्मद हाफिज आणि कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतके झळकावली. त्यांच्या अर्धशतकांच्या मदतीने पाकिस्तानने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चार बाद १९५ धावा केल्या.
या सामन्यात बाबर (४४ चेंडूत ५६) आणि फखर जमान (२२ चेंडूत ३६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला चांगली सुरुवात दिली होती. त्यानंतर हफीझने ही जबाबदारी चांगली पार पाडली आणि ३६ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. त्याने तिसर्या विकेटसाठी शोएब मलिक (१४) सह ५० धावांची भागीदारी केली. याबरोबरच हाफिजने टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. मलिक नंतर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २००० धावा करणारा तो दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला.
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली. सलामीवीर टॉम बंटन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी ६.२ षटकांत ६६ धावांची भागीदारी केली. दरम्यान, शादाब खानने आपल्या पहिल्या षटकात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना चालत केल. इंग्लंडच्या डावाच्या ७ व्या षटकातील दुसर्या चेंडूवर बेअरस्टो (४४) बाद झाला, तर पुढच्याच चेंडूवर बंटन (२०) बाद झाला.
पण त्यानंतर कर्णधार मॉर्गनने डेव्हिड मालानसह तिसर्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले. मॉर्गनने ३३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६६ धावा केल्या तर मालनने ३६ चेंडूत नाबाद ५६ धावा फटकावत संघाला ५ चेंडू राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून शादाब खखानने ३ तर हरीस रऊफने २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलेल्या बाबर आझमने केली विराट-फिंचच्या विश्वविक्रमाची बरोबरी
आमचा एक वॉट्सऍप ग्रुप आहे, त्यातूनच मला…. सीएसकेच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख –
तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट
भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल
आयपीएलमध्ये कर्णधार तर अनेक झाले, पण यश मात्र या ५ जणांनाच मिळाले