क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेची महिला फलंदाज मिग्नॉन डू प्रीज हिने शुक्रवारी (दि. 09 डिसेंबर) क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला. तिने जवळपास 16 वर्षांच्या कारकीर्दीनंतर टी20सह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू मिग्नॉनने ऑगस्ट महिन्यात बर्मिंघम येथे राष्ट्रमंडळ स्पर्धांमध्ये 2022च्या पहिल्या महिला क्रिकेट टी20 स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वचषक 2022मध्ये भाग घेतल्यानंतर ती आधी कसोटी आणि वनडेतून या वर्षाच्या सुरुवातीलाच निवृत्त झाली होती.
काय म्हणाली मिग्नॉन डू प्रीज?
मिग्नॉन डू प्रीज (Mignon Du Preez) हिने निवृत्तीबद्दल बोलताना म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे 15 वर्षांपेक्षा जास्त वर्षे चांगले राहिले आहेत. तुम्ही ज्या गोष्टीशी प्रेम करता, जितके मी क्रिकेटशी प्रेम करते, त्यापासून दूर जाणे कधीच सोपा निर्णय नसतो. मात्र, मला मनापासून माहिती आहे की, निवृत्तीची घोषणा करण्याचा हा योग्य वेळ आहे.”
— Mignon du Preez (@MdpMinx22) December 9, 2022
मिग्नॉन हिने म्हटले की, “मी जागतिक लीग क्रिकेटच्या छोट्या प्रकारात तोपर्यंत खेळत राहील, जोपर्यंत मला आई बनण्याचा आणि स्वत: कुटुंब सुरू करण्याचे सौभाग्य लाभत नाही. सर्वांच्या समर्थनासाठी खूप खूप धन्यवाद.” पुढे बोलताना मिग्नॉन म्हणाली की, “माझ्या पहिल्या मिनी- क्रिकेटचे प्रशिक्षक होण्यासाठी आणि मला या सुंदर खेळावर प्रेम करवण्यासाठी आणि अशाप्रकारे शानदार मॉडेल होण्यासाठी माझ्या आई-वडिलांना विशेष धन्यवाद.”
After 16 years in the green and gold of South Africa, Mignon du Preez announces her retirement from all forms of international cricket
Full Statement ⬇️ pic.twitter.com/DYD0r7jPeZ
— Proteas Women (@ProteasWomenCSA) December 9, 2022
तिने पुढे बोलताना म्हटले की, “एक विशेष धन्यवाद पीटर हेराल्ड आणि कर्टली डिझेल यांना गेले पाहिजे. त्यांनी मागील काही वर्षांमध्ये माझा खेळ वेगळ्या स्तरापर्यंत नेण्यासाठी माझ्यावर मेहनत घेतली. नॉर्दर्न क्रिकेट युनियनसाठी जेव्हा मी 10 वर्षांची होते, तेव्हा माझा ‘घरगुती आधार’ होण्यासाठी धन्यवाद.”
दक्षिण आफ्रिकेत 17 वर्षांच्या वयात मिग्नॉनने वनडे पदार्पण करण्याच्या सात महिन्यांनंतर ऑगस्ट 2007मध्ये तिने टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री केली होती. 33 वर्षीय मिग्नॉनने 114 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात तिने 20.98च्या सरासरीने 1805 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश होता. 2014मध्ये सोलीहुलमध्ये आयर्लंडविरुद्ध केलेली 69 धावांची खेळी तिची सर्वोत्तम खेळी आहे. (cricketer mignon du preez announced retirement from all forms of international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो अनुभवी कर्णधार नाही…’, केएल राहुलच्या नेतृत्वाबद्दल भारताच्या माजी सलामीवीराचे खळबळजनक वक्तव्य
महिला आयपीएलमधूनही उघडणार कुबेराचा खजाना! मिडीया राईट्ससाठी बीसीसीआयने केले टेंडर जारी