बिग बॅश लीग २०२० (बीबीएल) च्या सहाव्या सामन्यात गतविजेत्या सिडनी सिक्सर्सने मेलबर्न रेनेगेड्सचा १४५ धावांनी पराभव करत हंगामातील पहिला विजय मिळवला. बीबीएलच्या इतिहासातील हा धावांच्या फरकाने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. सिडनीने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऍरॉन फिंचच्या नेतृत्वातील मेलबर्न रेनेगेड्सचा संघ अवघ्या ६० धावांवर सर्वबाद झाला. रेनेगेड्सच्या या खराब कामगिरीनंतर चाहत्यांनी मेलबर्न संघाला चांगलेच ट्रोल केले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याने देखील मेनबर्न रेनेगेड्स संघाची ट्विटरवरून मजा घेतली.
सिडनीने मिळवला विक्रमी विजय
काल (१३ डिसेंबर) सिडनी सिक्सर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात बीबीएलमधील सहावा सामना संपन्न झाला. या सामन्यात मेलबर्न प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांचा डोंगर उभा केला. यष्टीरक्षक-सलामीवीर जोस फिलीपे याने ५६ चेंडूत ९५ धावांची वादळी खेळी केली. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॉर्डन सिल्कने १९ चेंडूत ४५ धावा ठोकल्या.
प्रत्युत्तरात, मेलबर्न रेनेगेड्स संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात कर्णधार फिंच बाद झाला. त्यानंतर मात्र रेनेगेड्सचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. रेनेगेड्सचे दोन्ही सलामीवीर ऍरॉन फिंच व शॉन मार्श हे दोघेच दोनअंकी धावसंख्या गाठू शकले. सिक्सर्सकडून वेगवान गोलंदाज बेन द्वारशीसने ४ तर स्टीव्ह ओकीफ आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.
वॉर्नरने घेतली रेनेगेड्सची चुटकी
मेलबर्न रेनेगेड्सच्या या खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नर याने ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत रेनेगेड्स संघाची मजा घेतली. त्याने लिहिले, “मी आत्ताच माझ्या स्क्रीनच्या खालील भागात ४३/९ असे पाहिले. मला वाटले ही वेळ आहे.”
Just looked at the bottom of my screen and saw 9/43 and thought it was the time 😢😢 #bbl
— David Warner (@davidwarner31) December 13, 2020
वॉर्नर सध्या आपल्या सोशल मीडिया खात्यांवर कमालीचा व्यस्त असतो. टिकटॉकवर तो अनेक भारतीय गाण्यांवर नृत्य करताना दिसायचा. दोन दिवसापूर्वीच त्याने प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ‘सुलतान’ सिनेमातील लूकचा स्वतःचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. ज्याला चाहत्यांनी पसंती मिळत आहे.
संबधित बातम्या:
– ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर; हा खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता
– काय कमाल कामगिरी आहे, भारतीय वेगवान गोलंदाजाचे वॉर्नरकडून तोंडभरून कौतुक
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान