मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डुप्लीसीने कोविड 19 साथीच्या रोगाशी लढा देणाऱ्या वंचित मुलांच्या जेवणासाठी निधी जमा करण्यासाठी आपली बॅट आणि गुलाबी रंगाची वनडेतील जर्सी लिलावासाठी दान केली. डुप्लेसीने नवीन आयएक्सयू बॅट आणि 18 क्रमांक लिहिलेली गुलाबी रंगाची जर्सी दान केली. त्याचा माजी साथीदार एबी डिव्हिलियर्सकडून नामांकन मिळाल्यानंतर त्याने हे काम केले.
डुप्लेसिने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर दोन्ही गोष्टींचा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “कोविड 19 साथीच्या रोगाचा बर्याच लोकांवर वाईट परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण आफ्रिकेत होत आहे. मी 2016 साली इंग्लंडविरुद्ध खेळतानाची माझी नवीन आयएक्सयू बॅट आणि पिंक वनडेतील गुलाबी जर्सी दान केली आहे. जीचा ‘ऑल इन आफ्रिका’ वेबसाइटवर लिलाव होईल.”
डुप्लेसीने लिहिले की, ‘या लिलावाची संपूर्ण रक्कम मी हिलसांग आफ्रिका फाउंडेशनने सुरू केलेल्या प्रकल्पात दिली जाईल. या प्रकल्पासाठी 500,000 रॅन्ड पर्यंत रक्कम जमा करणार आहे जे स्थानिक समुदायातील वंचित मुलांना जेवण देण्यासाठी वापरले जाणार आहे. या मुलांना मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दान केले जाईल.’
डुप्लेसी यापूर्वीही या संस्थेच्या संपर्कात होता. त्याची पत्नी, इमेरी विझर यांनी दक्षिण आफ्रिकेत 35,000 मुलांना जेवण देण्यासाठी धर्मादाय संस्थांकडून निधी गोळा केला.