वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या संजू सॅमसन याने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने त्याची स्तुती केली.
उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि 50 षटकात 351 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तार वेस्ट इंडीज संघ अवघ्या 151 धावांवर 36 व्या षटकात सर्वबाद झाला. शुमबन गिल, ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी महत्वपूर्ण खेळी केलीच. पण संजू सॅमसनचे अर्धशतक देखील महत्वपूर्ण ठरले. सॅमसनने 41 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. त्याने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मात्र सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता आणि अवघ्या 9 धावा करून बाद झाला होता. त्याआधी मालिकेतील पहिल्या वनडेसाठी सॅमसनला संघात स्थान मिळाले नव्हते.
त्याच्या या खेळीनंतर बोलताना कैफ म्हणाला,
“मी संजूच्या खेळाने कमालीचा प्रभावित झालो आहे. तो सामना बदलणाऱ्या खेळाडू करू शकतो. विश्वचषका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो सज्ज आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत दबावात शानदार अर्धशतक झळकावले.”
संजू याने भारतीय संघासाठी 2013 मध्ये पदार्पण केले होते. मात्र, असे असताना देखील त्याला अधिक संधी मिळालेली नाही. आगामी वनडे विश्वचषकात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास त्याची ही संधी हुकू देखील शकते. सध्या तरी संघ व्यवस्थापन त्याला पुरेशी संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
(Mohammad Kaif Praised Sanju Samson After Fifty Against West Indies)
महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफीत रियान पराग नावाचं वादळ! 259 धावा चोपत घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती