श्रीलंका क्रिकेट संघाने क्रिकेटविश्वाला कित्येत एकाहून एक सरस क्रिकेटपटू दिले आहेत. कुमार संगकारा, मुथैय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा ही त्यातील काही नावे. श्रीलंकेचा ३२ वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू थिसारा परेरा याचेही या यादीत नाव येते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या परेराने आज (०३ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
श्रीलंकाच्या मर्यादित क्रिकेट संघांचे एकवेळी नेतृत्त्व केलेल्या परेराने आगामी वनडे मालिकेपुर्वी निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना अचंबित केले आहे. २३ मे ते २७ मे या कालावधीत श्रीलंका संघ बांग्लादेश संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्या इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका होणार आहेत.
BREAKING: Thisara Perera retires from International Cricket 🇱🇰 pic.twitter.com/cei2YrVKTa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 3, 2021
परेराने १२ फेब्रुवारी २०१६ रोजी भारताविरुद्ध रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात हॅट्रिक घेतली होती. यासह ब्रेट लीनंतर वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला होता. २०१२ साली पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिकेत त्याने एका सामन्यात ६ विकेट्स चटकावल्या होत्या. यात त्याने घेतलेल्या सलग ३ विकेट्सचाही समावेश होता.
याबरोबरच आयपीएलमध्येही त्याने सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० ते २०१६ या कालावधीत आयपीएलमध्ये ३७ सामने खेळताना त्याने ३१ विकेट्स घेतल्या होत्या. सोबतच ४२२ धावाही केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल ब्रेकिंग! आज होणारा केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पुढे ढकलला, वाचा कारण
“…म्हणून क्रिकेट सोडून राजकारण निवडले,” आमदार मनोज तिवारीचा उलगडा