चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 मध्ये पहिल्या पराभवातून सावरत सलग दोन विजय संपादन केले. लखनऊ व मुंबई विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. असे असतानाच चेन्नई संघासमोर एक समस्या देखील उभी असलेली दिसते. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर हा दुखापतीमुळे हंगामातील उर्वरित किती सामन्यांमध्ये अनुपलब्ध राहील याविषयी कोणतीही माहिती नाही. याच मुद्द्यावर माजी भारतीय प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली.
आयपीएलमध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी चेन्नईचा दीपक चहर उपलब्ध असेल का? याबाबत चर्चा होत होती. त्यावेळी बोलताना शास्त्री यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले,
“मागील काही काळापासून अनेक भारतीय खेळाडूंनी एनसीएला आपले दुसरे घर बनवले आहे. खेळाडू तीन-चार महिन्यानंतर तिथे जातात. ही गंभीर बाब आहे. खेळाडूंनी एकदा तिथे गेल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होऊनच परत यावे. चहरचे म्हणाल तर तो चार सामने देखील फिट राहत नाही. अशाच त्याला आयपीएलमध्ये 14 कोटींची रक्कमही मिळते. ही विचित्र परिस्थिती आहे. त्याने लवकर पूर्ण तंदुरुस्त होऊनच मैदानावर यावे.”
चहरला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर देखील अशीच दुखापत झालेली. मागील दीड वर्षांपासून तो सातत्याने तंदुरुस्तीशी झगडतोय. सध्या आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म देखील चांगला राहिला नाही. पहिल्या तीन सामन्यात तो अपेक्षित कामगिरी देखील करू शकला नव्हता. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिले षटक टाकल्यानंतर तो मैदानाबाहेर गेलेला. सूत्रांच्या माहितीनुसार तो या हंगामातील देखील काही महत्त्वाचे सामने न खेळण्याची शक्यता आहे.
(Ravi Shastri Slams Deepak Chahar On His Fitness )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असूनही स्टोक्स खेळणार नाही! चेन्नई-राजस्थान सामन्याआधी माजी दिग्गजाची भविष्यवाणी
“माझे स्वप्न पूर्ण झाले”, दिल्लीला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने दिली भावनिक प्रतिक्रिया