वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना काल 12 डिसेंबर रोजी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळला गेला. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विंडीज संघाने या मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली होती. त्यामुळे त्यांच्या प्लेइंग 11 मध्येही बदल करण्यात आले. या सामन्यात 27 वर्षीय यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज आमिर जांगू याला वेस्ट इंडिज संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने सामना जिंकून देणारे शतक झळकावून संघ व्यवस्थापनाचा निर्णय पूर्णपणे सिद्ध केला. चौथ्या स्थानावर विकेटकीपरने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघही या मालिकेत क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला.
मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघाने 5 विकेट्स गमावून 321 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 86 च्या धावसंख्येपर्यंत 4 विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर केसी कार्टीला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आमिर जंगूची साथ मिळाली. या दोघांमध्ये 5व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. केसी कार्टी 95धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर जंगूने एका टोकापासून डावावर नियंत्रण ठेवत संघाला विजयाकडे नेण्याचे काम केले. जंगूने नाबाद माघारी परतलेल्या गुडाकेश मोतीसोबत सहाव्या विकेटसाठी 53 चेंडूत 91 धावांची नाबाद भागीदारी करून या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून दिला. आमिर जांगूने 83 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली. यासह जंगू वनडे पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा 46 वर्षांनंतर पहिला वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला आहे.
Leaving 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ as CG United ODI Champions!🏆#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/gyGLEoZvWj
— Windies Cricket (@windiescricket) December 12, 2024
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजने चौथ्यांदा 300 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत 2019 मध्ये आयर्लंड विरुद्ध डब्लिन येथे झालेल्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. ज्यात त्यांना 328 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या सामन्यातील बांग्लादेश संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार मेहदी हसन मिराज, सौम्य सरकार, महमुदुल्लाह आणि झाकेर अली यांच्या फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.
हेही वाचा-
IND vs AUS: गाबा कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, ॲडलेडमध्ये 5 विकेट्स घेणारा गोलंदाज बाहेर
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्याची चाैकाशी करा’, डिंग लिरेनवर रशियन महासंघाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप!
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, गॅरी कर्स्टननंतर आता या प्रशिक्षकाचा राजीनामा