आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहली (virat kohli) याच्याकडून भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद काडून घेतले आणि रोहित शर्मा (rohit sharma) याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआय (bcci) द्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयानंतर विराटचे चाहते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले होते, तर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी देखील यासंदर्भात त्यांचे मत मांडले आहे. अशात ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज गोलंदाज ब्रॅड हॉग (brad hogg) याने देखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वनडे संघाचे कर्णधापद बीसीसीआयने काडून घेण्यापूर्वी विराटने टी२० संघाचे कर्णधापद स्वतःच्या इच्छेने सोडले होते. विराटने त्यावेळी कामाच्या व्यापामुळे टी२० संघाचे कर्णधापद सोडलेले. अशात वनडे संघाचे कर्णधारपद बीसीसीआय त्याच्याकडून काढून घेईल, असी चाहत्यांना अपेक्षा नव्हती. परंतु ब्रॅड हॉगच्या मते बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय विराटच्या फायद्याचा ठरणार आहे.
ब्रॅड हॉग त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला की, “मला वाटते की, हे एक चांगले पाऊल आहे. कोहलीने फक्त याचा स्वीकार केला पाहिजे आणि पूर्णपणे निवांत झाला पाहिजे. सध्या वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद गेल्यामुळे विराटवरचा खूप दबाव कमी झाला आहे.” ब्रॅड हॉग पुढे म्हणाला की, विराटसाठी चांगलेच झाले की, त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले गेले. याचे कारण सांगताना तो म्हणाला, “यामुळे त्याच्या प्रदर्शनात सुधारणा होईल, जे मागच्या काही वर्षांपासून चांगले राहिले नाही. कारण तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व केल्यामुळे तो दबावात राहिला आहे. जे झाले ते चांगले झाले. रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र मिळून भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जावू शकतात”
दरम्यान, भारतीय संघाला या महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना व्हायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्यात कर्णधाराच्या रुपातील वनडे संघासोबतचा त्याचा प्रवास सुरू करणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी २०२१ वर्ष राहिलंय दुर्देवी, ऐतिहासिक विजय तर मिळवलेच पण २ आयसीसी ट्रॉफीही गमावल्या
‘महाराष्ट्राची नंबर १ डीश’ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल