मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात रविवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) होणार आहेत. या दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. हा सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे पार पडणार असून भारतीय प्रमाणेवेळेनुसार या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. तसेच त्यापूर्वी ३ वाजता नाणेफेक पार पडेल. या सामन्यासाठी कसा असू शकतो ड्रीम ११ संघ हे जाणून घेऊ.
असा असू शकतो पंजाब किंग्सचा संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) पंजाब किंग्सने आत्तापर्यंत ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले असून २ सामने पराभूत झाले आहेत. आता त्यांना सहावा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी पंजाबच्या संभावित ११ जणांच्या संघाचा (PBKS Predicted XI) विचार करायचा झाल्यास सलामीला कर्णधार मंयक अगरवालसह (Mayank Agarwal) शिखर धवन उतरू शकतो.
तसेच मधली फळी जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा आणि शाहरुख खान सांभाळू शकतात. अष्टपैलू म्हणून ओडीयन स्मिथचा चांगला पर्याय आहे. तसेच गोलंदाजीत कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि वैभव अरोरा यांना संधी मिळू शकते.
पंजाब किंग्सचा संभावित संघ – मंयक अगरवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडीयन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा
असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ
केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ हंगामात आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत आणि २ सामने पराभूत झाले आहेत. त्यांनी जिंकलेले तिन्ही सामने सलग जिंकले असून ते सध्या विजयी रथावर सवार आहेत. आता त्यांना ही विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांना सहावा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (SRH Predicted XI) विचार करायचा झाल्यास अभिषेक शर्मा आणि कर्णधार विलियम्सन सलामीला फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. तसेच राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंग हे मधली फळी सांभाळू शकतात. तर गोलंदाजीत जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक आणि टी नटराजन यांचा समावेश होऊ शकतो.
सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन.
अशी असू शकते ड्रीम ११
पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघातील (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) सामन्यासाठी फँटसी संघाचा (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून निकोलस पूरनला आणि जॉनी बेअरस्टोला संधी देऊ शकतो. फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर मयंक अगरवाल, शिखर धवन, राहुल त्रिपाठी यांना संघात घेऊ शकतो. या तिन्ही फलंदाजांनी मागच्या सामन्यात आपला दम दाखवलाय.
दुसरीकडे, अष्टपैलू म्हणून लियाम लिविंगस्टोन आणि ओडियन स्मिथचे नक्कीच उजवे ठरतील. यानंतर गोलंदाजांमध्ये आपण कागिसो रबाडा, टी नटराजन, राहुल चाहर आणि उमरान मलिक यांना संधी देऊ शकतो. या सामन्यात राहुल त्रिपाठीला संघाचा कर्णधार बनवू शकतो, तसेच लियाम लिव्हिंगस्टोनवर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवू शकतो.
पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (PBKS vs SRH) ड्रीम ११
कर्णधार – राहुल त्रिपाठी
उपकर्णधार – लियाम लिव्हिंगस्टोन
यष्टीरक्षक – निकोलस पूरन, जॉनी बेअरस्टो
फलंदाज – मयंक अगरवाल, शिखर धवन, राहुल त्रिपाठी
अष्टपैलू – लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ
गोलंदाज – कागिसो रबाडा, टी नटराजन, राहुल चाहर, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या!
मराठीत माहिती- क्रिकेटर दिनेश मोंगिया
बेंगलोरने १६ धावांनी जिंकली दिल्लीविरुद्धची लढत; मॅक्सवेल, कार्तिक अन् हेजलवूड विजयाचे शिल्पकार