संयुक्त अमिराती येथे झालेल्या आशिया चषक 2022च्या स्पर्धेतून रविंद्र जडेजा बाहेर झाला. त्यानंतर प्रत्येकांना एकच प्रश्न पडला तो म्हणजे त्याच्याजागी कोण? जडेजाच्या बाहेर जाण्याने अर्थातच भारतीय संघाच्या प्रदर्शनावर परिणाम दिसला. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने जडेजाच्या अनुपस्थितीत कोण या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हा खेळाडू जडेजा सारखाच तिन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी करतो.
भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा बदली खेळाडूचे नाव सांगितले आहे. त्याने यावेळी अक्षर पटेल (Axar Patel) याचे नाव घेतले आहे. रोहितच्या मते, अक्षर हा एक जडेजाच्या अनुपस्थितीत उत्तम पर्याय आहे. कारण तो तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी करतो.
जडेजा टी20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. सर्जरीमुळे तो या महत्वाच्या स्पर्धेला मुकला आहे. तर दुसरीकडे अक्षरला टी20 विश्वचषकाच्या संघात घेतले आहे. तो दर्जेदार फिरकीपटू असून फलंदाजीमध्येही चांगले शॉट्स मारतो. या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकांसाठी भारतीय संघात जागा मिळाली आहे.
रोहितच्या मते, जडेजाची कमतरता अक्षर पूर्ण करू शकतो कारण त्याच्यात तेवढी क्षमता आहे. तो पुढे म्हणाला, “जडेजा बाहेर झाल्याने आम्हाला अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. अक्षर हा आमच्या नियोजनाचा भाग होताच. ते दोघेही एकसारखे खेळाडू आहेत. अक्षरने नुकतेच वेस्ट इंडिजच्या मालिकेत चांगली फलंदाजी केली आहे. तसेच तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये गोलंदाजी करू शकतो. तसेच तो पॉवरप्ले, मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकतो.”
अक्षरने भारताकडून 26 सामन्यांत खेळताना 21 विकेट्स घेतल्या असून त्याने फलंदाजी करताना 147 धावा केल्या आहेत. तसेच त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत अंतिम अकरामध्ये संधी मिळाली तर त्याचा तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच सामना असणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर
व्हिडिओ: सामन्यापूर्वी भारताच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन कर्णधार; दिल्या 75व्या स्वातंत्र्याच्या हटके शुभेच्छा
‘पंत आणि कार्तिक दोघेही…’, भारतीय यष्टीरक्षकांविषयी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया