क्रिकेट खेळाचे जगभरात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. या खेळामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळासोबत खेळाडूवृत्तीमुळे जगभरातील चाहत्यांच्या मनात घर केले आहे. हे खेळाडू असे आहेत ज्यांचा तिरस्कार करणे खूपच कठीण आहे. हेच कारण आहे ज्याचा बळावर आज त्या खेळाडूंचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत.
खेळाडूंना त्यांच्या मैदानी प्रदर्शन आणि त्यांचा खेळावरून लोकांचा पाठींबा मिळतो. अशाप्रकारे काही खेळाडू लोकांचे चाहते होतात आणि ते जिथे कुठे जातील तिथे चाहते त्यांना पूर्णपणे पाठींबा देतात. आजच्या या लेखामध्ये आपण अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांना कोणीही नापसंद करत नाही.
५. आशिष नेहरा– २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झालेला भारतीय जलदगती गोलंदाज आशिष नेहराला एक उत्तम ‘टीममन’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा विनोदी स्वभाव इतर खेळाडूंसोबतच दर्शकांनासुद्धा आपलासा वाटतो. नेहरा जेव्हा गौरव चोपडा यांच्या कार्यक्रमामध्ये आला होता, तेव्हा तो खूपच विनोदी आणि हसतमुख अवतारात दिसला. यावेळी खूपच मजेशीर गोष्टी त्यांनी सांगितल्या. गेल्या काही वर्षांमध्ये नेहराच्या चाहत्यांच्यामध्ये वाढ झाली आहे. हा एक असा खेळाडू आहे, ज्याला खूपच कमी लोक नापसंद करत असतील.
४. ऍडम गिलख्रिस्ट– पूर्व ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट हा जरी मैदानावर तडाखेबाज फलंदाज होता; तरीही मैदानाबाहेर त्यांची ओळख शांत स्वभाव आणि आदर्श व्यक्तीमत्व अशी होते. गिलख्रिस्ट यांनी आपल्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीच्या जोरावर जगभरात आपले चाहते बनविले आहेत. गिलख्रिस्ट यांनी खूप वेळा मैदनामध्ये खेळ भावना जपल्या आहेत. बाद झाल्यावर पंचांचा निर्णय येण्याअगोदर ते स्वत: पव्हेलियनकडे निघून जायचे. भारतामध्ये गिलख्रिस्टचे खूप चाहते आहेत. त्यांनी युवा यष्टीरक्षक आणि फलंदाजांसाठी खूप आदर्श असे व्यक्तीमत्व उभे केले आहे.
३. ख्रिस गेल- वेस्ट इंडीजचा धडकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विनोदी स्वभावाशी आपण सगळे ओळखूनच आहोत. गेलला आपण मैदानात मोठे आणि लांबच लांब षटकार मारताना तर बघतोच; परंतु विरोधी संघातील खेळाडूंसोबत मस्ती-विनोद करताना सुद्धा बघतो. मैदानबाहेर सुद्धा गेलचा असाच स्वभाव आढळून येतो. हेच मुख्य कारण आहे कि गेलला पसंद करणारे चाहते जगभरात खूप आहेत.
२. केन विलियम्सन- न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आपल्या फलंदाजीने क्रिकेटजगतात कोट्यावधी चाहते बनवले आहेत. विलियम्सन न्यूझीलंड संघाचा कर्णधार असून तो स्वतछपुर्वी आपल्या संघाचा विचार करतो. संघाच्या हितासाठी तो नेहमीच पुढाकार घेत योगदान देत असतो. केन विलियम्सन याचे सुद्धा भारतात खूप चाहते आहेत आणि त्यामुळेच आईपीएलमध्ये त्याला भारतीयांकडून खूप पाठींबा मिळतो.
१. एबी डिविलियर्स- दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज एबी डिविलियर्स यांचे जगाच्या कानाकोपऱ्यात असंख्य चाहते आहेत. डिविलियर्स यांची मैदानातील फलंदाजी सगळ्यांच मन भरवून टाकते. डिविलियर्स ज्याप्रमाणे रचनात्मक आणि आक्रमक खेळतात त्यामुळे दर्शकांना ते बघायला खूप आवडते. भारतामध्ये विचारल तर सर्वाधिक लोकप्रिय फलंदाज म्हणून डिविलियर्स यांचे नाव नेहमीच वर असते. या खेळाडूने नेहमीच आपल्या फलंदाजीने उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वाचे हृदय जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-