प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे एक स्वप्न असते. असेच स्वप्न दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिर याचेही होते. मात्र, त्याला त्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याचे दु:ख आहे. त्याने आपल्या या स्वप्नाबद्दल सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याने पाकिस्तानमध्ये प्रत्येक स्तरावर क्रिकेट खेळले, पण त्याला हिरव्या रंगाच्या जर्सीत खेळण्याची संधी मिळाली नाही, याचे त्याला दु:ख आहे.
खरं तर, इम्रान ताहिर (Imran Tahir) याचा जन्म पाकिस्तानचा आहे. तो तिथे अनेक देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळला होता. तो त्याच्या घरातील सर्वात मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्याला तरुण वयात असतानाच काम करावे लागले होते. मात्र, चाचणीदरम्यान त्याची निवड पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघात झाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट पाकिस्तानमध्ये खेळले होते. मात्र, तो पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाकडून खेळू शकला नाही. तो पाकिस्तानपूर्वी यूकेला गेला आणि तिथून तो दक्षिण आफ्रिकेला गेला. तिथेच त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले.
‘पाकिस्तानकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही’
इम्रान ताहिर याला आजही दु:ख होते की, तो पाकिस्तानकडून खेळू शकला नाही. पाकिस्तान ज्युनिअर लीगमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत असलेल्या ताहिरने एका कार्यक्रमादरम्यान म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात कधीच धैर्य गमावले नाही. मी दुकानांवर पॅकिंग करण्याचे काम केले. मला गोलंदाजीसाठी कुणीच बोलावले नव्हते. चाचणीदरम्यान मला विचारण्यात आले की, कुणी पाठवले आहे. मी प्रत्येक स्तरावर पाकिस्तानकडून खेळलो, फक्त हिरव्या रंगाच्या जर्सीत खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी दक्षिण आफ्रिकेचा आभारी आहे, ज्यांनी मला क्रिकेट खेळण्याची संधी दिली. मी एका संधीच्या शोधात होतो आणि त्यांनी मला ती संधी दिली. मी क्रिकटेपटूंना हा सल्ला देईल की, कधीच हिम्मत सोडू नका. सतत संधीच्या शोधात राहा. मी जगासाठी एक उदाहरण आहे आणि मागील 22 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे.”
दक्षिण आफ्रिकेकडून ताहिरची कारकीर्द
दक्षिण आफ्रिकेसाठी इम्रान ताहिर याने 20 कसोटी सामने, 107 वनडे सामने आणि 37 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. अशाप्रकारे त्याने एकूण 165 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण 293 विकेट्स घेतल्या आहेत. या विकेट्स घेताना त्याने 10 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत आणि 7 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच