आयपीएल 2021 साठी तयारी सुरू झाली असून, लवकरच लीलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल 2021 साठी होणाऱ्या लिलावात अनेक टी-20 स्टार आपले नशीब आजमावणार आहेत. आयपीएल लिलावात सर्वात सक्रिय टीम असते ती मुंबई इंडियन्स. आपण या लेखात बघणार आहोत असे 3 टी-20 स्टार्स ज्यांच्यावर मुंबई इंडियन्स बोली लावण्यास उत्सुक असेल.
1) काइल जेमिसन –
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेमिनसन हा आयपीएल 2021 लिलावासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. भारताविरुद्ध 2020 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जेमिनसनने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई इंडियन्स जेमिनसनवर मोठा डाव लावण्यास उत्सुक असणार आहेत.
2) कार्लोस ब्रेथवेट –
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्लोस ब्रेथवेट हा टी20 क्रिकेट मधील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक मानला जातो. 2016 साली झालेल्या टी 20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात कार्लोस ब्रेथवेटने अंतिम षटकात सलग 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार संपूर्ण क्रीडा विश्वात सुप्रसिद्ध आहेत. ब्रेथवेटची ओळख क्रीडा विश्वात एक भरवशाचा खेळाडू म्हणून आहे. मुंबई इंडियन्स ब्रेथवेटला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी मोठी बोली लावू शकतात.
3) तनवीर संघा –
मूळचा भारतीय असलेला तनवीर संघा ऑस्ट्रेलियाकडून U 19 विश्वचषक खेळलेला आहे. संघा सध्या ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध अशा बिग बॅश लीग स्पर्धेत खेळत असून, त्यामध्ये तो उत्तम गोलंदाजी करतो आहे. संघा हा बिग बॅश लीग मध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज आहे. संघासारख्या लेगस्पिनरला आपल्या संघात घेऊन मुंबई इंडियन्स आपल्या फिरकी गोलंदाजीला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ
टीम इंडियाची ताकद जगासमोर! सिडनीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने रचला हा मोठा विक्रम
सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ