भारत 2023मध्ये वर्षातील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. याची सुरूवात टी20 सामन्याने होणार आहे. पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याच्या आधी भारतासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण एक सलामीवीर तर आधीच दुखापतीमुळे बाहेर झाला आहे आणि या मालिकेसाठी जो संघ निवडला आहे त्यातून किमान तीन तरी खेळाडू सलामीला फलंदाजी करतात. तर दोन खेळाडूंनाही सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. यामुळे श्रीलंकेविरुद्ध कोण दोघे सलामीला येणार हा प्रश्न कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारताच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी सलामीच्या जोडीबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या मालिकेत भारत रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित दुखापतीमुळे आधीच बाहेर आहे. तसेच या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्यांमध्ये इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल हे तिघेही सलामीला फलंदाजी करतात. मग यातून कोणते दोन खेळाडू सलामीला येतील हा प्रश्न उद्भवला आहे. यातील इशान तर सलामीसाठी कायम आहे. त्याच्या जोडीला गिल येऊ शकतो.
गिलला सलामीला पाठवण्याचे कारण म्हणजे त्याने मागील अनेक कसोटी आणि वनडे सामन्यात याच स्थानावर फलंदाजी केली आहे. तसेच भविष्याचा विचार केला तर तो भारताचा दुसरा सलामीवीर असण्याची दाट शक्यता आहे. तिसरे नाव ऋतुराजचे असून त्यालाही संधी दिली जाऊ शकते. त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 36 सामन्यात एक शतक करताना 1207 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर संघात संजू सॅमसन हा पण आहे. त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली असून त्याला अंतिम अकरामध्ये निवडले तर कोणत्या स्थानावर खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (INDvSL T20 with Ishan Kishan who will open Shubman Gill or Ruturaj Gaikwad)
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते
रिषभ पंतच्या अपघाताला नवीन वळण! डीडीसीएला स्वतः सांगितला घडला प्रकार