मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक खेळला गेला. भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार होता. मात्र, अंतिम सामन्यापर्यंत संघ पोहोचू शकला नाही. उपांत्य सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केल्या गेल्या. संघात असे काही खेळाडू होते, ज्यांना संपूर्ण विश्वचषकात एकदाही खेळण्याची संधी दिली गेली नाही. याच पार्श्वभूमीवर दिनेश कार्तिक याने युझवेंद्र चहल याचे नाव घेत या विषयाला पुन्हा हवा दिली आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारतीय संघाचा भाग होता. पण स्पर्धेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाही. चंहलला खेळण्याची संध दिली नाही म्हणून आणि संघ उपांत्य सामन्यात मोठ्या अंतराने पराभूत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर जोरदार टीका झाल्या. अशात आता या चर्चा शांत झाल्या असताना दिनेश कार्तिक (Dinesh karthik) पुन्हा नेटकऱ्यांचे लक्ष या मुद्याकडे वळवताना दिसत आहे.
युझवेंद्र चहल भारतीय संघाचा सर्वात यशस्वी टी-20 गोलंदाज आहे. पण तरीदेखील रोहितच्या नेतृत्वात त्याला टी-20 विश्वचषकातील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. चहलच्या जागी रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये प्राधान्य मिळाले दिले गेले. चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली पाहिजे होते, असे अनेक दिग्गजांना वाटते. दिनेश कार्तिक याविषयी बोलताना म्हणाला की, चहलला या संघात संधी दिली गेली असती, तर विरोधकांसाठी तो घातक ठरला असता.
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर अश्विनने स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती, मात्र शेवट चांगल्या पद्धतीने करू शकला नाही. पण चहल विरोधी संघांना चहल विरोधी संघांना अधिक नुकसान पोहोचवू शकत होता. तो एक चांगला पर्याय ठरला असता. पण परिणाम आल्यानंतर या गोष्टींकडे पुन्हा पाहणे आश्चर्याचे आहे,” असे कार्तिक माध्यमांशी बोलताना म्हणाला. दरम्यान, भारतीय संघ या विश्वचषक स्पर्देत उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात संघाला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. (Yuzvendra Chahal should get a chance in playing XI in T20 World Cup 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणी दुबईत तर कोणी काश्मिरमध्ये! टीम इंडियाचे शिलेदार देश-विदेशात साजरा करतायेत ‘न्यू इयर’; पाहा छायाचित्रे
आता ईशान किशन घेणार रिषभ पंतची जागा! महत्वाच्या मालिकेसाठी इतर दोघेही स्पर्धेत