भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये जंगी लढत सुरू आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. परिणामी संपूर्ण संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या 150 धावांवर कोसळला. भारतीय सलामी जोडी पहिल्या विकेटसाठी केवळ 5 धावा जोडू शकली कारण ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल एकही धाव करू शकला नाही. तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. जयस्वालने 8 चेंडूंचा सामना केला मात्र त्याला खाते उघडता आले नाही. तिसऱ्याच षटकात तो मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
भारतीय डावाच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरीही अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने एकट्याने कांगारू संघाच्या टॉप ऑर्डरला माघारी पाठवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज 67 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 104 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पहिल्या डावातील अपयशातून धडा घेत यशस्वी जयस्वालसह केएल राहुलने दुसऱ्या डावात सावध खेळ करत टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली आणि आपल्या खात्यात 15 धावांची भर घालून नवा इतिहास रचला.
यशस्वी जैस्वाल यांचा मोठा पराक्रम
वास्तविक यशस्वी जयस्वाल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या वर्षी 1000 हून अधिक धावा करणारा युवा सलामीवीर जो रूटनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. जयस्वालने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात 15 धावांचा टप्पा गाठताच भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासात रचला. जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा डावखुरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने 16 वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम माजी भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नावावर होता. गंभीरने 2008 साली कसोटी क्रिकेटमध्ये 8 कसोटी सामन्यांच्या 16 डावात 1134 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा डावखुरा भारतीय फलंदाज
यशस्वी जयस्वाल- 1135 धावा (2024)
गौतम गंभीर- 1134 धावा (2008)
हेही वाचा-
तिलक वर्माचा भीमपराक्रम! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला, 1981 नंतर टीम इंडियाने कांगारूंना दाखवले वाईट दिवस
लज्जास्पद..! विराट कोहली झेल सोडण्यात बाबर आझमच्याही पुढे