भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. अशात त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने अनोखे त्रिशतक ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीचा विक्रम
खरं तर, मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताने श्रीलंका संघाला 41 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा विजय विराट कोहली (Virat Kohli) याचा भारतीय संघासोबत 300वा आंतरराष्ट्रीय विजय (300th International Win) ठरला.
धोनीलाही पछाडले
विराट कोहली याने भारतीय संघासोबत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याच्या बाबतीत माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला मागे सोडले. धोनी 298 आंतरराष्ट्रीय विजयात भारतीय संघाचा भाग राहिला आहे.
कुणाच्या नावे विक्रम?
खरं तर, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजयात भारतीय संघाचा भाग बनण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिन 307 आंतरराष्ट्रीय विजयात भारतीय संघाचा भाग राहिला आहे.
रोहित-युवराज अव्वल-5मध्ये
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या कारकीर्दीतील हा 281वा आंतरराष्ट्रीय विजय ठरला. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग 230 आंतरराष्ट्रीय विजयांसह अव्वल-5 खेळाडूंमध्ये सामील आहे.
Virat Kohli Completed 300 Wins in Intl Cricket
Indians to be Part of Most Wins
307 – Sachin Tendulkar
300 – Virat Kohli*
298 – MS Dhoni
281 – Rohit Sharma*
230 – Yuvraj Singh#AsiaCup23— CricBeat (@Cric_beat) September 13, 2023
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजयांमध्ये भारतीय संघाचा भाग राहिलेले खेळाडू
307 – सचिन तेंडुलकर
300 – विराट कोहली*
298 – एमएस धोनी
281 – रोहित शर्मा*
230 – युवराज सिंग
विराट 13 हजारी मनसबदार
विशेष म्हणजे, श्रीलंकेपूर्वी विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध भिडला होता. यावेळी विराटने भारताकडून सर्वाधिक 122 धावा चोपत शानदार शतक साकारले होते. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 47वे शतक होते. या शतकासह विराटने वनडे क्रिकेट कारकीर्दीतील 13000 धावांचा टप्पाही पार करण्याचा पराक्रम गाजवला होता. (king virat kohli becomes second indian player to involve in indias most international wins after sachin tendulkar)
हेही वाचा-
भारत-बांगलादेश सामन्यातून दिग्गजाने घेतली माघार, वैयक्तिक कारण सोशल मीडियावर व्हायरल
प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल