क्रिकेट हे दिवसेंदिवस फलंदाजीसाठी सोप्पं होतं चाललं आहे. क्षेत्ररक्षणातील काही नियम, तसेच गोलंदाजीचे काही नियम यांमुळे फलंदाजांसाठी अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस खेळाडू हे फिटनेसला प्रचंड महत्त्व देत आहे.
या सर्वांचा परिपाक हा त्यांच्या खेळातही दिसत आहे. क्रिकेट हे आता जास्त स्फोटकपणे खेळले जात आहे. याचमुळे खेळातील षटकार चौकारांची संख्याही वाढली आहे. परंतु यातील षटकार मारताना कोणता फलंदाज सर्वात लांब षटकार मारतो, हे मात्र खूप कमी क्रिकेटप्रेमींना माहित आहे.
विशेष म्हणजे याबद्दल अनेक चुकिच्या माहितीही क्रिकेटप्रेमीमध्ये आहेत. याला कारण म्हणजे हे षटकारांच्या लांबी मोजण्याचे कोणतेही परिमाण पहिले नव्हते. तसेच हे अंतर कसे मोजायचे याबद्दल अनेक वाद आहेत.
काही षटकार व्हेरिफाय केले गेले त्यातील फलंदाज व कंसात त्यांनी मारलेल्या षटकारांचे अंतर लिहीले आहे. ब्रेट ली (१३०-१३५ मीटर, गाबा टेस्ट, २००५), एडन ब्लिझार्ड (१३० मीटर, वाका टी२०, २००८), मार्टिन गप्टील (१२७ मीटर, वेलिंग्टन टी२०, २०१२), एल्बी माॅर्केल (१२४-१२५ मीटर, चेन्नई टी२०, २००८), सिमाॅन डनवेल (१२२ मीटर, एमजीसी प्रथम श्रेणी, १९९३), एडम गिलख्रिस्ट (१२२ मीटर, आयपीएल २०११). Top 5 batsmen with most sixes in ODI cricket.
तर या लेखात आपण सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्या ५ फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
५. एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५वा आहे. धोनीने ५३८ सामन्यातील ५२६ डावात फलंदाजी करताना ३५९ षटकार मारले आहेत. त्याने कसोटीत ७८, वनडेत२२९ व टी२०मध्ये ५२ षटकार मारले आहेत. कर्णधार असताना त्याने ३३२ सामन्यात ३३० वेळा फलंदाजी करताना २११ षटकार मारले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे.
धोनीने ८ मार्च २००९ रोजी न्यूझीलंडविरुद्ध ८ मार्च २००९ रोजी अतिशय लांब व उंच षटकार मारला होता. हा षटकार मारल्यानंतर चेंडू कुठे गेला आहे हे देखील धोनीने पाहिले नव्हते.
४. मार्क वाॅ
मार्क वाॅ हा एक स्फोटक फलंदाज म्हणून संपुर्ण जगाला माहित होता. त्याने २१ नोव्हेंबर १९९७ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना डेनियल विटोरीच्या गोलंदाजीवर ११८ ते १२० मीटर दरम्यान षटकार मारल्याचे बोलले जाते.
३. युवराज सिंग
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कारकिर्दीत २४६ षटकार मारले आहेत. याचबरोबर त्याच्या नावावर जगातील सर्वात लांब मारलेल्या षटकारातील तिसरा लांब षटकार आहे. २२ सप्टेंबर २००७ रोजी टी२० विश्वचषकात युवराजने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने तब्बल १२० मीटर लांब षटकार मारला होता.
२. शाहिद आफ्रीदी
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू कर्णधार शाहिद आफ्रिदीने ५२४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०८ वेळा फलंदाजी करताना ४७६ षटकार मारले आहेत. यात त्याने वनडेत ३५१, कसोटीत ५२ व टी२०मध्ये ७३ षटकार मारले आहेत. ज्यावेळी स्फोटक फलंदाजी अन्य फलंदाज करत नव्हते त्या काळात आफ्रिदीने आपल्या षटकारांनी जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. याच आफ्रिदीने १५८ मीटर लांब षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेत स्टेडियम बाहेरच्या गोल्फच्या मैदानात हा षटकार मारला होता.
https://www.youtube.com/watch?time_continue=32&v=3IOAZ8s-kVk&feature=emb_logo
१. अल्बर्ट ट्राॅट
अल्बर्ट ट्राॅट हा एक असा खेळाडू होता जो इंग्लंड व ऑस्ट्रेलिया अशा दोन देशांकडून क्रिकेट खेळला. त्याने १८९५ ते १८९९ या काळात क्रिकेट खेळले. तर १९१४ साली वयाच्या ४१ व्या वर्षी तो मृत्यु पावला. या खेळाडूला ओरिजनल हिटॅमन असेही म्हटले जाते. १८९९मध्ये लाॅर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळताना त्याने असा काही षटकार मारला होता की चेंडू लाॅर्ड्सच्या बाल्कनीच्या वरुन जात मैदानाबाहेर पडला होता. आजही कोणत्या खेळाडूला तसा षटकार मारता आलेला नाही.
मनोरंजक लेख-
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू
–बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच
–जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार