भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका नुकतीच बुधवारी संपली. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंनी खोऱ्याने धावा काढल्या. तसेच या मालिकेदरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी काही अफलातून झेलही घेतले. एवढेच नाही तर प्रेक्षकांनीही स्टँडमध्ये काही शानदार झेल घेतले.
कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात अनेक क्रिकेट मालिका प्रेक्षकांविना खेळल्या गेल्या. मात्र ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात झालेली वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टँडमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या मालिकेदरम्यान मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमला. या मालिकेदरम्यान प्रेक्षकांचा उत्साह देखील दिसून आला.
याच मालिकेत खेळाडूंनी सीमारेषेबाहेर मारलेले काही चेंडू स्टँडमध्ये गेले, त्यावेळी काही प्रेक्षकांनी चांगले प्रयत्न करत शानदार झेल घेतले.
या मालिकेत खेळाडूंनी मैदानात आणि प्रेक्षकांनी स्टँडमध्ये घेतलेल्या झेलांचा व्हिडिओ cricket.com.au या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की स्टिव्ह स्मिथ, मोझेस हेन्रीक्स, रवींद्र जडेजा यांनी काही चांगले झेल घेतले. तसेच स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकानेही एक अविश्वसनीय असा झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर तो खाली पडला देखील. पण असे असले तरी त्या प्रेक्षकाचा उत्साह कमी झाला नव्हता.
Have a look back at the best catches from the Dettol ODI series – and they weren't all taken by players either! #AUSvIND pic.twitter.com/3zCqFxNG2o
— cricket.com.au (@cricketcomau) December 3, 2020
वनडे मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर