भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आज दुपारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना युवराजने तो यापूढे आयपीएलही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तो बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेतही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. असे असले तरी तो भारताबाहेरील टी20 लीगमध्ये खेळणार आहे.
युवराजने निवृत्ती घोषित करण्याआधीच तो आयसीसीच्या मान्यताप्राप्त विदेशी टी 20 लीगमध्ये फ्रीलान्स करियरची करण्यासाठी निवृत्तीचा विचार करीत असल्याच्याही चर्चा होत्या. त्याचबरोबर युवराजला परदेशातील टी20 लीग खेळण्याच्या ऑफर येत असल्याच्याही चर्चा होत होत्या. आता याला युवराजकडूनच पुष्टी मिळत आहे.
युवराजने म्हटले आहे की ‘मी आयपीएलचे सामने खेळणार नाही. तसेच मी बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी परदेशातील टी२० स्पर्धा येत्या काळात खेळण्याचा विचार करत आहे.’
बीसीसीआय त्यांच्या अंतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या क्रिकेटपटूला परदेशी लीग खेळण्यातची परवानगी देत नसल्याने युवराजने बीसीसीआयच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली असल्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने बीसीसीआयची परवानगी न घेता कॅरेबियन प्रीमीयर लीगच्या ड्राफ्टमध्ये त्याचे नाव दिले होते. पण नंतर बीसीसीआयने त्याला या ड्राफ्टमधून नाव मागे घ्यायला लावले होते.
त्याने आत्तापर्यंत 40 कसोटी सामन्यात 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 304 सामन्यात खेळताना 8701 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने वनडेत 111 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर युवराजने आयपीएलमध्ये 132 सामने खेळताना 2750 धावा केल्या आहेत आणि 36 विकेट्सही घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
-युवराजबरोबर पदार्पण केलेले ४ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट