पुणे, 23 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत आठव्या फेरीअखेर पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी याने पहिल्या पटावर आकर्षक विजयासह एकुण 7.5गुणांची कमाई करताना आघाडीचे स्थान कायम राखले. तर, त्याचवेळी दुसऱ्या मानांकित अभिमन्यू पुराणिकला पराभवाचा सामना करावा लागला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आठव्या फेरीत सेतुरामन एसपी याने ग्रँड मास्टर विशाख एनआर विरुद्ध काळी मोहरी घेऊन खेळताना अत्यंत तंत्रशुद्ध चलींच्या सहाय्याने निर्णायक विजय मिळवला. तर दुसऱ्या पटावर ग्रँड मास्टर पी इनियन विरुध्द रंगतदार लढतीत दोघेही कल्पक डावपेचांचा वापर करीत असताना अभिमन्यू पुराणिक ने मोक्याच्या क्षणी केलेली चूक त्याला भोवली. इनियनने डावाच्या अखेरीला बिनचूक चाली करताना महत्वपूर्ण विजय मिळवून 7गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळवले.
तिसऱ्या पटावर पश्चिम बंगालच्या ग्रँड मास्टर मित्रभा गुहा आणि दिप्तयन घोष ही लढत दोघेही तोडीस तोड चाली करत असल्यामुळे बरोबरीच्या दिशेने चालू होती. परंतु डावाच्या मध्यावर असताना गुहा घोषच्या गुंतागंतीच्या डावपेचांमध्ये अडकला. अखेर गुहाने शरणागती पत्करल्यामुळे घोषने विजयाची नोंद करून 7गुणांसह संयुक्त दुसरे स्थानावर झेप घेतली
आणखी एका धक्का दायक निकालात आंतरराष्ट्रीय मास्टर आरोण्यक घोषने पांढरी मोहरी घेऊन खेळताना ग्रँड मास्टर दीप सेनगुप्ता चा सनसनाटी पराभव केला. सेनगुप्ता सारख्या अनुभवी खेळाडू विरुध्द घोषने संयमी चाली करताना टप्प्याटप्प्याने डावावर वर्चस्व गाजवले. अखेर सेनगुप्ताने दाडपणा खाली पराभव मान्य केला. त्यामुळे घोषने 7गुणांसह संयुक्त दुसरे स्थान राखले. (At the end of the eighth round of the National Chess Championship 2023, Sethuraman SP’s lead remained)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: आठवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
विशाख एनआर(6गुण)(आरएसपीबी)पराभुत वि. सेतुरामन एसपी(7.5गुण)(पीएसपीबी);
अभिमन्यू पुराणिक(6 गुण)(एएआय) पराभुत वि.इनियन पी(7गुण)(तामिळनाडू);
मित्रभा गुहा(6गुण)(पश्चिम बंगाल)पराभुत वि.दिप्तयन घोष(7गुण)(पश्चिम बंगाल);
आरोण्यक घोष(7गुण)(आरएसपीबी)वि.वि.दीप सेनगुप्ता(6गुण)(पीएसपीबी);
नीलाश साहा(7गुण)(आरएसपीबी)वि.वि.श्यामनिखिल पी(5.5गुण)(आरएसपीबी);
सूर्य शेखर गांगुली (6गुण)(पीएसपीबी)बरोबरी वि.कृष्णा सीआरजी (6गुण)(आरएसपीबी);
मेहर चिन्ना रेड्डी सीएच(5.5गुण)(आरएसपीबी)पराभुत वि.आकाश जी(6.5गुण)(तामिळनाडू);
राजेश नायक (6गुण)(ओडिशा)बरोबरी वि.अनुज श्रीवात्री (6गुण)(मध्यप्रदेश);
अपूर्व कांबळे(5.5गुण)(कर्नाटक)पराभुत वि.विष्णू प्रसन्ना.व्ही (6.5गुण)(तामिळनाडू);
श्रीहरी एलआर(6.5गुण)(तामिळनाडू)वि.वि. विघ्नेश वेमुला(5.5गुण)(तेलंगणा);
अर्घ्यदीप दास(5 गुण)(आरएसपीबी)पराभुत वि.वेदांत गर्ग(6.5गुण)(चंदीगढ);
इमोचा लैश्राम(5गुण)(पीएसपीबी)पराभुत वि.अभिजीत गुप्ता(6गुण)(पीएसपीबी);
सेतुमाधव येल्लुमहंथी(5गुण)(आंध्रप्रदेश)पराभुत वि.सायंतन दास(6गुण)(आरएसपीबी);
राम कृष्णन(5.5गुण)(बीएसएनएल)बरोबरी वि.व्यंकटेश एमआर(5.5गुण)(पीएसपीबी);
शंखोदिप डे(5गुण)(पश्चिम बंगाल)पराभुत वि.सिद्धांत मोहपात्रा(6गुण)(आरएसपीबी);
हर्ष हिमांशू(5गुण)(बिहार)पराभुत वि.उत्कल साहू(6गुण)(ओडिशा);
लक्ष्मण आरआर(6गुण)(आरएसपीबी)वि.वि.यश भराडिया(5गुण)(राजस्थान).
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स संघाची विजयी सलामी
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, ईगल्स, गोशॉक्स संघाची विजयी सलामी