क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. सर्व खेळाडू खेळाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. मात्र, अनेकदा सामन्यादरम्यान या खेळाला गालबोट देखील लागते. क्रिकेटमध्ये केल्या जाणाऱ्या मंकडींगमुळे यापूर्वी खेळाच्या प्रतिष्ठेला अनेकदा धक्का लागला आहे. भारताचा वरिष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या बाबतीत एक नवा खुलासा केला आहे. ज्या एका युवा भारतीय खेळाडूने खलनायक ठरवले जाऊ नये म्हणून, मंकडींग करण्यास नकार दिला होता, असे अश्विनने सांगितले.
या सामन्याचा केला उल्लेख
रविचंद्रन अश्विनने नुकतीच भारताचा माजी फिरकीपटू व सध्या समालोचक असलेल्या मुरली कार्तिकसोबत युट्युबवर चर्चा केली. या चर्चेत मंकडींगचा विषय निघाला असताना, अश्विनने एका घटनेचा उल्लेख केला.
अश्विनने सांगितले, “आयपीएल २०१९ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती. मुंबईसाठी अल्झारी जोसेफ व राहुल चाहर ही अखेरची जोडी मैदानात असताना, मी माझ्या संघाचा गोलंदाज अंकीत राजपूत याला मंकडींगविषयी सांगितले. मात्र, असे केल्यास मला व्हिलन बनवले जाईल, असे तो म्हणाला व मंकडींग करण्यास नकार दिला. मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे त्याला म्हटले. परंतु, त्याने मंकडींग केले नाही व मुंबईने हा सामना जिंकला. नॉन स्ट्राइकला असलेला चाहर त्यावेळी चेंडू टाकण्याची बराच पुढे आलेला.”
रविचंद्रन अश्विन २०१९ मध्ये पंजाब किंग्स संघाचा कर्णधार होता. मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्स विरुद्ध राजस्थानचा प्रमुख फलंदाज जोस बटलर याला मंकडींग केले होते. यानंतर बराच वाद निर्माण झालेला.
आयपीएल २०२१ मध्येही झाली चर्चा
कोरोनामूळे स्थगित झालेल्या आयपीएल २०११ मध्ये देखील मंकडींगची जोरदार चर्चा झालेली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात मुंबईचा धवल कुलकर्णी अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना लवकर पळालेला. यावर समालोचन करणा-या ब्रॅड हॉग याने जोरदार आक्षेप नोंदविलेला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मुलाला कोरोना टेस्ट करण्यासाठी झाली मारहाण? हरभजनने व्यक्त केला संताप
रोहित आणि विराट यांच्यासोबत चर्चा करताना मिळतात ‘हे’ सल्ले, शुभमन गिलचा खुलासा
बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे