आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी सध्या स्थगित करण्यात आसा आहे. पण आता हा मोसम भारताबाहेर आयोजित होण्याचीच शक्यता दाट आहे.
आयएएनएसशी बोलताना एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने यावर्षीची आयपीएल भारताबाहेर होणार असल्याचा इशारा दिला आहे. भारताबाहेर यूएई आणि श्रीलंका असे दोन पर्याय आयपीएल २०२० च्या आयोजनासाठी आहेत. पण अजूनतरी बीससीआय टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल आयसीसीचा अधिकृत निर्णय येण्याची वाट पाहत आहेत, त्या निर्णयानंतर आयपीएलच्या १३ व्या मोसमाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
बीसीसीआय अधिकारी म्हणाले, ‘आम्ही ठिकाणाबद्दल अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु सर्व संभाव्यता पाहिल्यानंतर यावर्षी आयपीएल भारताबाहेर होऊ शकते. भारतात अशी परिस्थिती नाही की सर्व संघ एक-दोन शहरांमध्ये एकत्र येऊ शकतील. जरी सामने बंद दारामागे खेळवायचे झाले तरी खेळाडू आणि सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी हे योग्य होणार नाही.’
‘आयोजनासाठी यूएई आणि श्रीलंकेमध्ये स्पर्धा आहे. पण आम्हाला कोरोना व्हायरसच्या परिस्थितीनुसार आम्ही कुठे आयपीएल आयोजित करु शकतो याचा निर्णय घ्यावा लागेल. प्रशासनालाही यामध्ये लक्ष द्यावे लागेल. आम्ही लवकरच निर्णय घेऊ.’
सध्या तरी आयसीसी यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल सातत्याने बैठका घेत आहे. कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता टी२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. पण आता याबद्दल अंतिम निर्णय जूलैच्या तिसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्यानंतर बीसीसीआय आयपीएल बाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात. कारण बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरच्या कालावधीत आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. परंतू टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने त्याचा काय निर्णय होतो, त्यावर आयपीएलच्या आयोजनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसेच याआधीही आयपीएलचे परदेशात आयोजन करण्यात आले आहे. २००९ ला दक्षिण आफ्रिकेत संपूर्ण आयपीएल मोसम झाला होता. तर २०१४ ला पहिले २० सामने यूएईमध्ये झाले होते. त्यामुळे आता यावेळीही आयपीएलचे आयजन भारताबाहेर होणार का, हे पहावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी –
टॉपलेस फोटो शेअर करणाऱ्या माजी महिला खेळाडूवर इंस्टाग्रामची कारवाई; म्हणते, स्वातंत्र्यावर…
आश्चर्यकारक! बीसीसीआय नाही तोडणार चीनी कंपन्यांशी संबंध; म्हणतात, कधीच…ट
शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यपदाचा राजीनामा; आता हे दिग्गज होऊ शकतात अध्यक्ष