मुंबई। सोमवारी (१९ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १२ वा सामना पार पडला. हा सामना चेन्नईने ४५ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. ड्वेन ब्रावोची बॅट फटका मारताना अचानक उंच हवेत उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून अखेरच्या षटकावेळी ड्वेन ब्रावो आणि शार्दुल ठाकूर फलंदाजी करत होते. तसेच राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर ब्रोवोचा फटका चुकला, त्याचवेळी त्याच्या हातून बॅट निसटली आणि ती वर उंच हवेत उडाली. त्याचबरोबर चेंडूही बॅटला लागून डीप मिड-विकेटला पडला.
त्यामुळे बॅट जरी हातात नसली तरी ब्रावोने आणि शार्दुलने चपळाईने दोन धावा पळून काढल्या. यावेळी दुसरी धाव ते धावत असताना क्षेत्ररक्षकाने स्ट्रायकर्स एन्डला चेंडू फेकला होता. मात्र, ब्रोवोने तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली होती. या घटनेचा व्हिडिओ तसेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/lodulalit001/status/1384184515954831371
ब्रावोने नंतर याच षटकात शेवटच्या चेंडूवर षटकात ठोकत चेन्नईला १८८ धावांपर्यंत पोहचवले होते. त्याने नाबाद २० धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस(३३), अंबाती रायडूने (२७) आणि मोईन अलीने (२६) यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला.
No bat, no problem for DJ Bravo 😄#IPL2021 pic.twitter.com/XdjNGk2URR
— Wisden India (@WisdenIndia) April 19, 2021
Drop the bat and run d world mode on! 😯 #CSKvRR #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/USnAdJ9b1A
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2021
चेन्नईच्या गोलंदाजांनी राजस्थानला रोखले
प्रतिउत्तरादाखल राजस्थान संघ १८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. पण त्यांना २० षटकात ९ बाद १४३ धावा करता आल्या. त्यांच्याकडून जोस बटलर ४९ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षेनुसार साथ मिळाली नाही. राजस्थानकडून त्याच्याव्यतिरिक्त राहुल तेवतिया (२०) आणि जयेदव उनाडकट (२४) यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला.
चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
सॅल्यूट माही! टी२० क्रिकेटमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय कर्णधार बनला धोनी
चौदा वर्षात कोणाला न जमलेला ‘हा’ विक्रम धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने करून दाखवला
…आणि धोनीला डाईव्ह माराताना पाहून चाहत्यांना झाली २०१९ विश्वचषकातील ‘त्या’ घटनेची आठवण