---Advertisement---

‘आयसीसी! दिल्लीतील प्रदूषणाचा क्रिकेटर्सला त्रास होतोय,’ जाणकाराने थेट आयसीसीलाच धरलं दोषी

Arun Jaitley Stadium, Delhi
---Advertisement---

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023चे यजमानपद भूषवत आहे. विश्वचषकासाठी एकूण 10 संघ भारतात आले आहेत, ज्यांची भारतीयय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सर्व सोय केली आहे. मात्र, अशातही बीसीसीआयवर टिका होताना दिसते. कारण ठरते आहे ते दिल्लीमध्ये वाढत असलेले हवा प्रदूषण.

वनडे विश्वचषग 2023 (CWC 2023) चा 38वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) दिल्लीतील प्रदुषित हवेमध्ये या दोन्ही संघांना विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेतील सामना खेळावा लागला. लाईव्ह सामन्यात देखील हवेतील प्रदुषणामुळे चित्र स्पष्ट दिसत नव्हते. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दिल्लीतील प्रदुषणाबाबत तिक्रार केली आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा कट्टर चाहता आणि भारतावर नेहमी टिका करणाऱ्या डॅनियल ऍलेकझँडर याचे एक ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. डॅनिलयने या ट्विटमध्ये थेट आयसीसीला या आयोजनाबाबत जाब विचारला आहे.

डॅनियल ऍलेकझँडरने आपल्या व्हायरल ट्विटमध्ये लिहिले की, “पाहुण्या संघाच्या क्रिकेटपटूंना दिल्लीमध्ये हवा प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. आयसीसी यावर काहीच करत नाही, याचे कारण काय?” दरम्यान, चाहत्यांच्या याबवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, दिल्लीतील प्रदुषणामुळे श्रीलंका आणि बांगलादेश सांनी या सामन्याआधी आयोजित होणार असलेले सराव सत्र देखील रद्द केले होते. शनिवारी (4 नोव्हेंबर) श्रीलंकन संघ याठिकाणी सराव करणार होता, पण संघाच्या मेडिकल टीमने त्याना सराव सत्र रद्द करण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे बांगलादेश संघाने मात्र, शनिवारी सायंकाळी 6 नंतर याठिकाणी सराव केला. पण त्याआधी शुक्रवारी होणारे सराव सत्र त्यांनी रद्द केले होते.

दरम्यान, रविवारी (5 नोव्हेंबर) भारतताने दक्षिण आफ्रिका संघाला 243 धावांनी पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला. ट्वीटवर प्रचंड सक्रिय असणाऱ्या डॅनियल ऍलेक्सझँडर यानेही भारतीय संघ आणि बीसीसीआयवर टीका केली. डॅनियने आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून काही गंभीर आलोप विश्वचषकाच्या यजमान संघावर केले आहेत. (A cricket connoisseur complained directly to the ICC about the pollution in Delhi)

महत्वाच्या बातम्या – 
भारतीय दिग्गजाला तब्बल ‘एवढ्या’ लाखांना चुना, पैसे दुप्पट करण्याच्या नादात बसला सगळंच घालवून
विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---