क्रिडाविश्वात एक संघ जिंकतो तेव्हा एक संघ पराभूत होतो, मात्र त्या पराभवाने चाहत्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि तो वाद इतके मोठे रूप घेईल याचा कोणी विचार देखील करत नाही. याचाच प्रत्यय इंडोनेशियामध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान आला. ही घटना इतकी धक्कादायक होती की अनेकांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागले आहेत तर जखमींची संख्याही मोठी आहे.
इंडोनेशियन लीगमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे समर्थक यांच्यात वाद झाला. काही वेळातच या वादाने रौद्ररूप धारण केले, ज्यामध्ये 120 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जेव्हा हा वाद निर्माण झाला तेव्हा पोलिसांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकरण हाताबाहेर गेले. पोलिसांना देखील गर्दीला नियंत्रण करता येत नव्हते. त्यानंतर आधीच रागात असलेल्या चाहत्यांनी पोलिसांवरच हल्ला करायला सुरूवात केली. यामुळे हिंसक रूप प्राप्त झालेल्या या घटनेने अनेक लोक जखमीही झाले आहेत.
https://twitter.com/Ultramaniatics/status/1576415200546541568?s=20&t=6mQhHROPH163Lh-C-OYcrw
इंडोनेशियातील कंजुरहन स्टेडियम, इस्ट जावा येथे बीआरआय लीग 1चा सामना सुरू होता. हा सामना अरेमा एफसी (Arema FC) आणि पर्सेबाया (Persebaya) क्लब यांच्यात खेळला जात होता. यामुळे संपूर्ण स्टेडियम या दोन्ही संघांच्या चाहत्यांनी एकदम खचाखच भरले होते. मात्र सामन्याचा निकाल लागला असता दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये वादाला सुरूवात झाली. बघता बघता हा वाद पूर्ण स्टेडियमभर पसरला. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनादेखील तो वाद मिटवता आला नाही यामुळे आर्म्ड फोर्सला बोलावण्यात आले, मात्र त्याला खूपच उशिर झालेला दिसला. तरीही कसेतरी करून त्या जवानांनी वाद निर्माण करणाऱ्या लोकांना बाहेर काढले. स्टेडियमच्या बाहेरही हा वाद थांबला नाही आणि त्याला हिंसेचे रूप प्राप्त झाले.
Keluarga besar Persebaya turut berdukacita sedalam-dalamnya atas jatuhnya korban jiwa setelah laga Arema FC vs Persebaya
Tidak ada satupun nyawa yang sepadan dengan sepak bolaAlfatihah untuk para korban
Dan semoga keluarga yang ditinggalkan diberikan ketabahan🥀
— Official Persebaya (@persebayaupdate) October 1, 2022
हा सामना पर्सेबायाने 3-2 असा जिंकला. पोलिसांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच या घटनेमुळे बीआरआय लीग 1 आठवड्यभरासाठी स्थगित करण्यात आली. तो वाद थांबण्यासाठी पोलिसांनी अश्रू बॉम्ब आणि लाठीचार्जही केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्यांदा इंडिया लिंजेड्स बनला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा दारून पराभव
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर
देशांतर्गत हंगामावर सर्फराजचे ‘राज’! इराणी ट्रॉफी फायनलमध्ये ठोकले नाबाद वादळी शतक