---Advertisement---

शमीच्या 7 विकेट्सची आधीच झालेली भविष्यवाणी! ज्योतिष नेटकरी चर्चेत

Mohammed Shami
---Advertisement---

भारतीय संघान वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. उपांत्य सामन्यात मोहम्मद शमी याच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकांसह शमीच्या 7 विकेट्स विजयात महत्वाच्या राहिल्या. शमीचे प्रदर्शन अनेकांसाठी आश्चर्यकारक असले तरी, एका नेटकऱ्याने याबाबत आधीच भविष्य वर्तवले होते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा विश्वचषकाचा उपांत्य सामना बुधवारी (16 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. भारताने या सामन्यात 70 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ 50 षटकात 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने कडवी झुंज दिली. मात्र, 48.5 षटकांमध्ये 327 धावांवर न्यूझीलंडने सर्व विकेट्स गमावल्या. मोहम्मद शमी याने 9.5 षटकांमध्ये 57 धावा खर्च करून विक्रमी 7 विकेट्स घेतल्या.

शमी भारतासाठी विश्वचषक सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. ही कामगिरी कोणत्याही गोलंदाजासाठी सोपी गोष्ट नाही. असे असले तरी, डॉन माटेओ या नावाच्या नेटकऱ्याने शमीच्या 7 विकेट्स हॉलबाबत सामन्याच्या एक दिवस आधीच भविष्य वर्तवले होते. सोशल मीडिया साईड ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) डॉन माटेओ याने याबाबत पोस्ट केली होती की, “मी असे स्वप्न पाहिले की, शमीने उपांत्य सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.” नेटकऱ्याने ही पोस्ट मंगळवारी (14 नोव्हेंबर) म्हणजेच सामन्याच्या एक दिवस आधी केली होती. त्याने वर्तवलेली भविष्यवाणी शमीच्या प्रदर्शानानंतर अगदी खरी ठरल्याने अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याला पुढच्या सामन्यासाठी, तर काहींनी दैनंदिन जीवनाबाबत भविष्य विचारले आहे.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात विराट कोहली याने कारकिर्दीतील 50 वे शतक केले. 113 चेंडूत 117 धावा केल्यानंतर विराट वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याला त्याने पछाडले. श्रेयस अय्यर यानेही 70 चेंडूत 105 धावांची खेळी करत विश्वचषकातील सलग दुसरे शतक ठोकले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडसाठी डॅरिल मिचेल याने 134 धावांची अप्रतिम खेळी केली. कर्णधार केन विलियम्सन आणि मिचेल यांनी मोठी खेळी केल्याने भारतीय संघ अडचणीत अल्याचे दिसत होते. मात्र, शमीने 33व्या षटकात विलियम्सनला वैयक्तिक 69 धावांवर बाद केले. (A netizen had already predicted Mohammad Shami’s 7 wickets in the semi-final)

महत्वाच्या बातम्या – 
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---