भारतीय संघाचा माझी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर सचिन त्यांच्या कुटुंबासमवेत रमलेला दिसला आहे. त्यातच कोरोना काळात सचिनचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. मागील एका वर्षात सचिनने कधी योगासनचे तर कधी स्वयंपाकघरात आपल्या आवडीचे जेवण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता सचिनच्या कुटुंबामध्येे एका सदस्याचा समावेश झाला आहे. तो सदस्य म्हणजे सचिनने एक आपल्या घरी एक पाळीव कुत्रा आणला आहे. ज्याचे नाव स्पाइक असे आहे. याची ओळख सचिनने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना करून दिला आहे. त्याचबरोबर सचिनने कॅप्शन लिहिले की, ‘स्पाईक माझा नवीन साथीदार आहे, जो आज सोशल मीडियावर पहिल्यांदा दिसत आहे.’
My new ‘Paw’tner, Spike is making his social media debut today! ????
Say Hi! ???? pic.twitter.com/9J4KZQ75je
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 27, 2021
याचा अर्थ असा आहे की, येत्या काही दिवसात सचिन तेंडुलकर स्पाइक सोबत दिसून येणार आणि फोटो देखील पोस्ट करणार आहेत. सचिनचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. त्यांच्याबरोबर वेळ घालवणे देखील त्याला खूप आवडते. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सचिन काळाच्या रंगाच्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेतल्याचे दिसून आला आहे. सचिनने पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सचिन गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो भारतीय संघाचा नवा सदस्य असो किंवा जुना किंवा इतर कोणत्याही खेळाशी किंवा व्यवसायाशी संबंधित असलेली एखादी कलागुण असो त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कधीच कोणती कसर सोडत नाही किंवा कोणाचा वाढदिवस देखील विसरत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट अडकला वादाच्या भोवर्यात! ‘या’ कारणासाठी लवकरच मिळणार रीतसर नोटीस
आनंदाचा क्षण! भारताकडून पदार्पण करणाऱ्या ४ खेळाडूंना मिळाली ‘या’ वरिष्ठांकडून कॅप, पाहा व्हिडिओ