क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यात काहीही होऊ शकते. काही वेळा वडिल-मुलगा एकत्र आपण खेळताना पाहिले आहे. कधी दोन भाऊ एकाच सामन्यात खेळताना पाहिले आहे. तर कधी काका-पुतणे, गुरू-शिष्य यांनाही आपण एकत्र खेळताना पाहिले आहे.
परंतु पंच वडिलांनी खेळाडू मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी बाद दिलेले पाहिले आहे का? तर क्रिकेटमध्ये ही गोष्टही झालेली आहे.
बांगलादेशने २००६साली केनियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी ३ वनडे सामने खेळले होते. हे तीनही सामने बांगलादेश संघाने जिंकले देखील होते. या तीनही सामन्यात फिल्ड अंपायर म्हणून भारताचे क्रिष्णा हरिहरन व केनियाच्या सुभाष मोदी यांनी काम पाहिले होते.
याच सामन्यात सुभाष मोदी यांचा मुलगा हितेश मोदी हा केनिया संघाकडून खेळत होता. यातील दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मर्श्रफी मुर्तझाने हितेशला पायचीत केले. त्यावेळी फिल्डवर पंच म्हणून सुभाष मोदी काम पाहत होते. त्यांनी तात्काळ फलंदाजी करत असलेल्या आपल्या मुलाला बाद दिले. A father being an on-field umpire ruled his son out in international cricket.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एकमेव असा क्षण राहिला ज्यात वडिलांनी मुलाला बाद दिले होते. सुभाष मोदी यांनी एकूण २२ वनडे सामन्यात पंचगिरी केली तर मुलगा हितेश मोदी केनियाकडून ६३ वनडे सामने खेळला. सुभाष मोदी हे केनियात स्थायिक असून त्यांचे सध्याचे वय ७४ वर्ष आहे तर मुलगा हितेशचे वय ४८ वर्ष आहे.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
पुण्यातच १० हजार वनडे धावा करण्याची सचिनची संधी १९ वर्षांपुर्वी हुकली होती
मोठ्या क्रिकेटरच्या गाडीतून चोरी झाले पाकिट, चोराने केली मोठी शाॅपिंग
वनडेत शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अशी कामगिरी करणारा सचिन जगातील एकमेव