क्रीडाविश्वात खळबळ माजवणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग महिला खेळाडूवर एका पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचे धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. याबद्दल पीडित महिला खेळाडूने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. ही घटना पंजाबमधील लुधियाना येथील असल्याचे समजत आहे.
पीडित खेळाडूने तक्रार केली आहे की क्रीडा विभागाच्या कोट्यातून नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने अनेकदा बलात्कार केला. या प्रकरणाची तक्रार करताना पीडित महिला खेळाडूने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेबद्दल सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप लावताना पीडित महिला खेळाडूने सांगितले आहे की सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये बोलावले जायचे. तिथे तिच्यावर आत्याचार करायचा. तसेच या अधिकाऱ्याने तिचा एक अश्लील व्हिडिओसुद्ध बनवला होता. त्याचबरोबर तो तिला ब्लॅकमेल करायचा. त्याचा खोटेपणा समोर आल्यानंतर या पीडित महिलेने त्याचा विरोध केला होता. पण त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे अखेर या पीडितीने तक्रार दाखल केली आहे.
या संतापजनक प्रकरणाच्या तपासासाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी प्रज्ञा जैन यांनी सांगितले की ‘अजून आरोपींबाबत पुष्टी झाली नाही. आरोपांबाबत आधी तपास केला जाईल. जर आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.’
Punjab: A national weightlifting player has accused a police official of raping her several times on the pretext of getting her a govt job in sports quota, in Ludhiana.
"Appropriate action will be taken after verifying the allegations," ADCP Pragya Jain said yesterday. pic.twitter.com/XYzVt2s1WG
— ANI (@ANI) June 3, 2021
पीडित महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असा’ होता भारतीय संघाचा मुंबई ते साउथॅम्प्टन प्रवास; आता ३ दिवस राहावे लागणार क्वारंटाईन
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रवी शास्त्रींच्या ‘या’ शब्दांमुळे वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद सिराजने केली उल्लेखनीय कामगिरी