आयपीएल 2023 च्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मंगळवारी (15 नोव्हेंबर) सर्व संघांनी त्यांच्या रिटेलन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी संघांना शेवटची मुदत दिली गेली होती. सर्व संघांनी त्यांच्या याद्या जाहीर केल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी एक भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमरून ग्रीन, तसेच इंग्लंडचे अष्टपैलू सॅम करन आणि बेन स्टोक्स याना आयपीएलच्या आगामी हंगामात सर्वातम महागडे खेळाडू असू शकतात.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही एक पोस्ट शेअर करत या तिघांची नावे घेतले आहेत. कॅमरून ग्रीन (Cameron Green), सॅम करन (Sam Curran) आणि बेने स्टोक्स (Ben Stokes) यांना चोप्राने या यादीत ठेवले आहे. चोप्रांच्या मते हे तिघेरी स्वतःच्या संघासाठी मागच्या काही महिन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत आणि आयपीएलमध्ये त्यांच्याकडून अशीच अपेक्षा आहे.
आकाश चोप्राने या ट्वीटमध्ये लिहिले की, “ग्रीनने जर त्याचे नाव लिलावासाठी दिले, तर तो सर्वात महागडा खेलाडू ठरू शकतो. सॅम करन दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. यादीत तिसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स असेल. आयपीएल लिलाव आश्चर्यचकित करणारा असू शकतो, पण हाच क्रम असू शकतो.”
दरम्यान, कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियन संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडत आला आहे. त्याने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतके केले होते. असे असले तरी नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळू शकला नाही. दुसरीकडे इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करून मागच्या मोठ्या काळापासून चांगले प्रदर्शन करत आला आहे. त्याने यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात एकूण 13 विकेट्स घेतल्या आणि मालिकावीर देखील ठरला. इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकवून देण्यासाठी ग्रीनची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेत सर्वांना चकित केले होते.
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार मागच्या वर्षी आयपीएल खेळला नव्हता. स्टोक्स यापूर्वी आयपीएल 2017 आणि 2018 मध्ये लिलावात सर्वात महागात विकला गेला होता. तो मागच्या मोठ्या काळापासून आयपीएल खेळत आला आहे. त्याने नुकत्याच खेळल्या केलेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अंतिम सामन्यात मॅच विनरची भूमिका पार पाडली. (Aakash Chopra said this three players will be the most expensive in ipl 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायकल वॉन विरुद्ध भारतीय संघ! हार्दिक पंड्याचे माजी इंग्लिश कर्णधाराला प्रत्युत्तर
सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी