गुरुवारपासून (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आहे. कारण, भारताकडून विराट कोहली 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने अत्यंत मोठे विधान केले आहे.
भारतीय अंडर नाईन्टीन संघाचा कर्णधार ते भारतीय संघाचा कर्णधार व दिग्गज फलंदाज अशी ओळख त्याने आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत बनवली आहे. विराटला अगदी जवळून पाहणारा आकाश चोप्रा यावेळी व्यक्त होताना म्हणाला,
“विराटचे क्रिकेटप्रति समर्पण अत्यंत स्पष्ट दिसून येते. त्याचे हे आयुष्य एखाद्या सन्यास्याप्रमाणे दिसून येते जे केवळ क्रिकेटसाठीच आहे. यामुळेच सध्या तो या ठिकाणी दिसून येतो. त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या या योगदानासाठी आपण सर्वजण त्याचे नेहमीच आभारी राहू.”
भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट गुरुवारी सामील होईल. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने आपल्या चोवीस वर्षांच्या कारकीर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याचा समावेश आहे. धोनीने त्याच्या कारकीर्दीत भारताकडून 538 सामने खेळले. तसेच, तिसऱ्या स्थानी भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असून, त्याने कारकीर्दीत एकूण 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
(Aakash Chopra Said Virat Kohli Life Is Like Monk On His 500 The International Match)
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ