गेल्या काही दिवसांपासून असे दिसून येते की, आजकाल कमेंटेटर आणि सलामीवीर आकाश चोप्रा स्कूप शॉर्टवर संशोधन करत आहे. काही दिवसा अगोदर आकाशने सूर्यकुमार यादवच्या स्कूप शॉर्टबद्दल सविस्तर चर्चा करण्यात केली. म्हणूनच आज त्याने आपल्या इंस्टाग्रामवर भाष्य करत आणखी एक स्कूप शॉटचा व्हिडिओ शेअर केला.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, आकाशला गावातून क्रिकेटचे उत्कृष्ट व्हिडिओ मिळत राहतात आणि तो नियमितपणे आपल्या प्रतिक्रियांसह व्हिडिओ शेअर करत राहतो.
यावेळेसचा व्हिडिओदेखील बाहेरील गावाचा असल्याचे समजते. ज्यामध्ये काही मुलं मॅटीग प्रकारची खेळपट्टी घालून क्रिकेट खेळत आहेत. ते साध्या चेंडूवर क्रिकेट खेळत आहेत. या व्हिडिओमध्ये एक मुलगा ऑफ साईडकडे शफल करतो आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडून जातो.
या व्हिडिओमध्ये खेळलेल्या स्कूप शॉटचा व्हिडिओ आकाशने शुक्रवारी शेअर करत म्हणाला,” अरे वा क्या बात है यार! अगर वह जोश बटलर है, यह भी अपना बॉस है|”
यात काहीच शंका नाही की, व्हिडिओ मधल्या मुलाने उत्कृष्ट असा स्कूप शॉट खेळला आहे. परंतु, हे देखील खरं आहे की, साध्या आणि चामडी बॉल पासून स्कूप शॉट खेळण्यात खूप फरक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
परफेक्ट जोडी! दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर आपल्या ‘खास’ मित्रासोबत घालवतोय वेळ, बघा फोटो
काय सांगता! अनुष्का शर्मा नाही तर ‘या’ अभिनेत्रीचा विराट कोहली होता मोठा फॅन, स्वत:च दिली कबुली