fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘विराट कोहली उतावळा कर्णधार’, भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाची टीका

Aashish Nehra says, Virat Kohli is a impulsive captain

November 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग दुसर्‍या वनडे सामन्यांत हार पत्करावी लागल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला आहे. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले. आखलेल्या योजनांची अंमलबजावणी गोलंदाज करू शकले नाही, असे मत कोहलीने व्यक्त केले होते.

मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने या मताशी असहमती दर्शविली आहे. नेहराच्या मते कोहलीने गोलंदाजीच्या क्रमात वारंवार बदल केल्याने संघाचे अधिक नुकसान झाले.

गोलंदाजांबाबत संयम दाखविण्याची अपेक्षा

क्रिकबझ या संकेतस्थळाशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “विराट कोहली गोलंदाजांकडून झटपट परिणाम दिसण्याची अपेक्षा ठेवतो. त्याच्याकडे संयम कमी आहे. परिणाम दिसत नाही, अशी शक्यता वाटताच तो उतावळेपणाने लगेच गोलंदाजीत बदल करतो. मात्र, त्याला गोलंदाजांना योजना अंमलात आणण्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे आहे.”

रविवारी (२९ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचे उदाहरण देताना नेहरा म्हणाला, “या सामन्यांत कोहलीने शमीला तीनषटके दिली, आणि त्यानंतर लगेच नवदीप सैनीला गोलंदाजीसाठी आणले. त्याला शमीला दुसर्‍या टोकाकडून आणायचे होते, हे जरी खरे असले तरी मग जसप्रीत बुमराहला नवीन चेंडूंवर केवळ दोन षटके देण्याचा निर्णय अनाकलनीय होता.”

विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दलही नेहराने आपले मत मांडले. पहिल्या वनडे सामन्यांतील कोहलीने खेळलेले आक्रमक फटके पाहून तो ३७५ ऐवजी ४७५ धावांचा पाठलाग करतो आहे, असे मला वाटत होते, अशी मजेशीर टिप्पणीदेखील नेहराने केली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत


Previous Post

‘…तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा,’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे वक्तव्य

Next Post

‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, काँग्रेस नेत्याने भारतीय खेळाडूबद्दल प्रश्न केला उपस्थित

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

'तुझी खेळभावना कुठे गेली?', काँग्रेस नेत्याने भारतीय खेळाडूबद्दल प्रश्न केला उपस्थित

वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर 'या' स्टार कुस्तीपटूची माघार

Video: महान फुटबॉलपटू मॅराडोना यांना मेस्सीकडून खास अंदाजात श्रद्धांजली

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.