---Advertisement---

ये दोस्ती हम नही छोडेंगे! चहलला संघात स्थान न दिल्याने, डिव्हिलियर्सने व्यक्त केली नाराजी

AB de Villiers
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघाने आपली 17 सद्सीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला जागा न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फेलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावाचाही समावेश झाला आहे. डिव्हिलियर्स आयपीयलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आरसीबी संघातुन चहलसोबत खेळला आहे.

एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) त्याच्या यूट्युब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला भारतीय संघातून आशिया चषचासाठी वगळ्यात आले. निवडसमितीने त्यांच्या याजना आणि निर्णय स्पष्ट केले आहेत. त्यांना कोणत्या खेळाडूंसोबत पुढे जायचे आहे हे त्यांनी ठरविले आहे. चहल सारख्या गोलंदाजाला संघात सामिल न करणे ही माझ्यासाठी निराशाजनक बाब आहे. जर तुम्हच्या संघात लेगस्पिनर असेल तर संघासाठी तो पर्याय कधीही चांगला ठरतो. चहल हा संघाला सामना जिंकवणारा गोंदाज आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.”

भारतीय संघाच्या आशिया चषक संघ घोषणेनंतर जेव्हा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना चहलचा संघात समावेश न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, निवड समितीला चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. चहलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, संघाचा समतोल राखण्याकडे लक्ष द्यावे लागले. संघात दोन रिस्ट स्पिनर्स बसवणे अवघड होते.

भारतीय संघाने आगामी आशिया चषकासाठी 3 फिरकी गोलंदाजांना संघात स्थन दिले आहे.
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या 17 सदस्यीय संघावर नजर टाकली तर त्यात 3 फिरकीपटूंना स्थान मिळाले असून, कुलदीप यादवशिवाय रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या नावाचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत आशिया चषकातील श्रीलंकेच्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये या तिघांसह खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. (ab de villiers says indian cricket team drop yuzvendra chahal )

महत्वाच्या बातम्या-  
‘श्रीलंका आणि बांगलादेशला कमी समजू नका’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा भारत-पाकिस्तानला सल्ला
पोलार्ड पॉवर अजून फुल! सलग 4 चेंडूवर ठोकले 100 मीटर पेक्षा जास्तचे षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---