---Advertisement---

विराटचा खास मित्र होणार तिसऱ्यांदा बाप; अनुष्काने दिल्या शुभेच्छा!

On: गुरूवार, जुलै 16, 2020 11:22 AM
---Advertisement---

नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खास मित्र लवकरच तिसऱ्यांदा बाप बनणार आहे. विराटचा हा खास मित्र इतर कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्स आहे. तो यावर्षाच्या शेवटी तिसऱ्या मुलाचा वडील बनणार आहे.

डिविलियर्सची पत्नी डॅनियल डिविलियर्सने (Danielle De Villiers) मंगळवारी (१४ जुलै) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.

डॅनियलने बेबी बंपसह फोटो शेअर केला आहे. याआधी डिविलियर्सला २ मुले आहेत. डिविलियर्सची पत्नी डॅनियलने शेअर केलेल्या फोटोवर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने डॅनियलच्या फोटोवर कमेंट करत लिहिले, “डॅनियल आणि एबी…खूप चांगली बातमी आहे.”

https://www.instagram.com/p/CCoLkj_A02r/?utm_source=ig_web_copy_link

केवळ अनुष्काच नव्हे तर डिविलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियलचे अनेक चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा डिविलियर्स (AB De Villiers) आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवत आहे. काही काळापूर्वी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याच्या पुनरागमनावरील चर्चा बंद झाल्या होत्या. डिविलियर्स आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळतो. हे दोघेही एकमेंकाचे चांगले मित्र आहेत.

डिविलियर्स पुन्हा मैदानावर उतरू शकतो. कारण दक्षिण आफ्रिकेत १८ जुलै रोजी अनोख्या सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. जिथे २ नाही तर ३ संघात सामना होणार आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ; या खेळाडूंना मिळाली संधी

-सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत असा झाला वेगवान गोलंदाज

-मद्यपानाची वाईट सवय या ५ क्रिकेटपटूंना पडली भलतीच महागात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---