युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात ३ वेळेस आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आणि २ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. परंतु हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास होता. कारण हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना होता. या खास दिवशी त्याचा संघसहकारी एबी डिविलियर्सने त्याला खास भेट दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पडल्यानंतर, आयपीएल स्पर्धेत देखील त्याने विक्रमी कामगिरी सुरू ठेवली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील ३१ वा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना ठरला. यासह एकाच फ्रँचायजीसाठी २०० सामने खेळणारा विराट कोहली एकमेव खेळाडू ठरला आहे.
या खास दिवशी एबी डिविलियर्सने त्याला एक खास जर्सी भेट म्हणून दिली आहे, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एबी डिविलियर्स आणि विराट कोहली हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. मैदानातील भागीदारीसह मैदानाबाहेर देखील त्यांची मैत्री खूप घट्ट आहे.
Yesterday before the match, Ab De Villiers given 200 number jersey to Virat Kohli on occasion of Virat Kohli's 200th for RCB. pic.twitter.com/TkCC66xxnX
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 21, 2021
"I've always known there's something special in you but as I see it, there's a lot more to it than Virat Kohli, the destined man to be great"- AB❤ pic.twitter.com/EldkRSAJqe
— anushka🥀 (@SOLEMNLYVIRAT) September 21, 2021
AB Devilliers gifted a special jersey to Virat Kohli for completing 200 matches for the #RCB franchise. pic.twitter.com/FppUTnMksa
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2021
एकाच फ्रँचायजीसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट अव्वल
विराट कोहलीने २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत या फ्रँचायजीसाठी एकूण २०० सामने खेळले आहेत. विराटनंतर या यादीत एमएस धोनीचा समावेश आहे. एमएस धोनीने या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि रायसिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकूण १८२ सामने खेळले आहेत. तर सुरेश रैनाने देखील चेन्नई सुपर किंग्स संघासाठी १७२ सामने खेळले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज कायरोन पोलार्ड याने मुंबई इंडियन्स संघासाठी एकूण १७२ सामने खेळले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघासाठी १६२ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दारुण पराभवानंतरही आरसीबीचे स्थान कायम, केकेआरला मात्र भरपूर फायदा; पाहा पाँईट टेबलची सद्यस्थिती
वेंकटेशचे ‘स्वप्नवत पदार्पण’, जेमीसनच्या भेदक चेंडूवर ८८ मीटरचा षटकार ठोकत लुटली मैफील
चक्रवर्तीच्या चक्रीवादळात अडकला मॅक्सवेल, चेंडूने गर्रकन फिरकी घेत क्षणात उडवल्या दांड्या