पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने काही वर्षांपूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ‘बेबी बॉलर’ म्हटले होते. मात्र, आता त्यानी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. अब्दुल रज्जाक याच्या म्हणण्यानुसार, त्यानी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. बुमराह चांगला गोलंदाज नाही असे मी कधीच म्हटले नाही.
एका मुलाखतीदरम्यान अब्दुल रझाक (Abdul Razzaq) याने सांगितले होते की, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक महान वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे, त्यामुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याच्यासमोर एक बाळ गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध तो खूप धावा करू शकला असता.
जसप्रीत बुमराह सध्या विश्वचषक 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करत असून त्याने अनेक विकेट्स घेतल्या आहेत. यावर एका भारतीय चाहत्याने अब्दुल रज्जाक याला विचारले की, त्या वक्तव्यावर तुम्ही काय बोलाल. त्याला प्रत्तुत्तर देताना रज्जाक म्हणाला, “त्यावेळी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, जसप्रीत बुमराह आणि शोएब अख्तर यांना तुम्ही कसे पाहता असा प्रश्न होता. यावर मी म्हणालो होतो की, “बुमराह अजूनही त्यांच्यासमोर एक बाळ गोलंदाज आहे. तो चांगला गोलंदाज नाही असे मी म्हटले नाही. त्यांच्यासमोर तो एक बाळ गोलंदाज आहे. वसीम अक्रम आणि ग्लेन मॅकग्रासमोर बुमराह काहीच नाही.”
नुकतेच वसीम अक्रमनेही जसप्रीत बुमराहचे खूप कौतुक केले होते आणि त्याला स्वतःपेक्षा चांगले म्हटले होते. वसीम अक्रम म्हणाला होता, “बुमराह जेव्हा विकेटभोवती डाव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करतो तेव्हा तो उजव्या हाताच्या फलंदाजांना माझ्याप्रमाणेच आऊटस्विंगर गोलंदाजी करतो. पण माझ्यापेक्षा बुमराहचे नवीन चेंडूवर चांगले नियंत्रण आहे.”
भारतीय संघाचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. भारताने विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत चांगले प्रर्दशन केले आहे. भारताने 6 पैकी 6 सामने जिंकुण गुणतालिकेत प्रथम क्रमांक गाठला आहे. (Abdul Razzaq took back the statement that Bumrah is a baby bowler said this is an important thing)
म्हत्वाच्या बातम्या
अफगाणिस्तानच्या विजयाने ‘या’ संघाचे भलेमोठे नुकसान, Points Tableमध्ये घसरला सातव्या स्थानी
‘मी ऑस्ट्रेलिया संघाला अजिबात…’, ऑस्ट्रेलियन संघाबाबत मॅथ्यू हेडनचं धक्कादायक विधान