---Advertisement---

मराठमोळ्या श्रेयांकाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त 2 धावा खर्चून हाँगकाँगचा अर्धा संघ पाठवला तंबूत

Shreyanka-Patil
---Advertisement---

एसीसी महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एक सामना भारतीय महिला अ विरुद्ध हाँगकाँग महिला अ संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 5.2 षटकातच सामना नावावर केला. हाँगकाँग संघ अवघ्या 34 धावांवर सर्वबाद झाला. तसेच, भारतीय संघाने 9 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयाचे श्रेय मराठमोळ्या श्रेयांका पाटील हिला जाते. श्रेयांका पाटील 3 षटके गोलंदाजी केली. यामध्ये तिने 1 मेडन षटक टाकत 2 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या आणि पराक्रम गाजवला.

अवघ्या 16 धावात पडल्या 10 विकेट्स, श्रेयांकाच्या 5 विकेट्स
हाँगकाँग महिला अ संघाकडून मारिको हिल हिने सर्वाधिक 14 धावांचे योगदान दिले. तिच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी मिळून 16 धावा केल्या. श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) हिने 5 विकेट्स घेतल्या. श्रेयांकाने या सामन्यात अर्धा हाँगकाँग संघ तंबूत पाठवला. तिने मारिको हिल, मरीना लॅम्प्लो, मरियम बीबी, बेट्टी चॅन आणि ऋचिता वेंकटेशन या 5 खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त मन्नत कश्यप आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर तितास साधू हिने 1 विकेट घेतली.

भारताचा डाव
हाँगकाँगच्या 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीवीर श्वेता सेहरावत ही गोलंदाज बेट्टी चॅन हिच्या गोलंदाजीवर बाद झाली. तिला यावेळी 2 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. तिच्यानंतर उमा छेत्री आणि गोंगाडी त्रिशा यांनी 5.2 षटकात 38 धावा करून संघाला विजयी केले.

हाँगकाँग संघावर श्रेयांका पडली भारी
श्रेयांका पाटील हिच्या गोलंदाजीवर हाँगकाँ संघ संघर्ष करताना दिसला. 3 षटके गोलंदाजी करताना श्रेयांकाने 1 षटके निर्धाव टाकले. तसेच, 12 चेंडूत 2 धावा खर्चून तिने 5 विकेट्स चटकावल्या. खरं तर, श्रेयांका महिला प्रीमिअर लीग स्पर्धेत आरसीबी संघाकडून खेळली होती. तिने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 23 धावा झळकावल्या होत्या. (acc emerging asia cup 2023 hong kong women a vs india a women cricketer shreyanka patel took 5 wickets)

महत्वाच्या बातम्या-
शुबमनला Out देण्याच्या निर्णयावर श्रद्धा कपूरही संतापली, थेट पंचांना केलं ट्रोल, लगेच वाचा
बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---