पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने चौथ्या दिवसाखेर 2 बाद 76 धावा केल्या. शेवटच्या डावातील दोन्ही विकेट्स रविचंद्रन अश्विन याने घेतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद सिराज याने शेवटच्या दिवसाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. सिराजच्या मते अश्विन सामन्याच्या शेवटच्या दिवशी कॅरेबियन संघाला झटपट बाद करू शकतो.
मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला, “खेळपट्टी पाहून असे वाटतं आहे की, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) कॅरेबियन संघाचा डाव उद्ध्वस्त करेल. कारण चेंडू टर्न होत आहे.” सिराजने असेही सांगितले की, वेस्ट इंडीजला मोठे लक्ष्य देणे, हे भारताच्या रणनीतीचा भाग होते. तो म्हणाला, “ईशान किशन आख्रमक फलंदाज आहे. रिषभ पंत नाहीये, त्यामुळे ईशान त्याची कमी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो गोलंदाजांची धुलाई करू शकतो आणि चेंडू मैदानाच्या चारही बाजूला मारू शकतो. पहिल्या डावात आम्हाला आघाडी मिळाली होती. अशात दुसऱ्या डावात कमी वेळात जास्त धावा करायच्या होत्या.”
मोहम्मद सिराजच्या मते अश्विन शेवटच्या दिवशी भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. पण त्याच्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षाही मोठ्या आसतील. कारण चौथ्या दिवशी त्याने तब्बल 4 विकेट्स घेतल्या आणि डावातील आपले विकेट्सचे पंचक पूर्ण खेले. यासाठी त्याला पहिल्या डावात एकून 23.4 षटके गोलंदाजी केली आणि 60 धावाही खर्च केल्या.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि 438 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 255 धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात भारताला 183 धावांची आघाडी मिळाली होती आणि संघाने आपला दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. परिणामी वेस्ट इंडीजला 365 धावांचे भलेमोठे लक्ष्य मिळाले. वेस्ट इंडीजला शेवटच्या दिवशी अजून 289 धावा करायच्या आहेत. (According to Mohammad Siraj, Ravichandran Ashwin will be the match winner for India in the second Test against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
“बुमराह आधीसारखी गोलंदाजी करू शकेल का?”, दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
जोडी जबरदस्त! अश्विन-जडेजाने एकत्रित गाठला 500 बळींचा टप्पा, आता जंबो-भज्जीच्या विक्रमावर नजर