भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जगातील कुठल्याही कोपऱ्यात हा सामना असला तरी दोन्ही देशातील चाहते हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी खचाखच गर्दी करत असतात. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशातील राजकीय वादामुळे या दोन संघात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही. या संघांची लढत केवळ आयसीसीच्या स्पर्धांमधेच पहावयास मिळाली. अशातच दोन्ही देशातील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात.
या दोन्ही ही संघांनी २०१२ मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका खेळली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय वादांमुळे एकही मालिका खेळली गेली नाही.
पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या नाते संबंधावर भर दिला जात आहे आणि लवकरच एक मालिका खेळवण्यात येऊ शकते. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने एका वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही ही देशांमध्ये शांतता करार करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्यात यावे असे देखील प्रयत्न सुरू आहेत.”
तसेच पुढे सांगण्यात आले की,” जर मालिका खेळवण्याची परवानगी मिळाली तर, दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाऊ शकते. या माालिकेसाठी दोन्ही ही संघ ६ दिवसांचा वेळ तर काढू शकतात. यावर्षी खूप क्रिकेट खेळले जाणार आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांकडे जास्त कालावधी नाही. परंतु नातेसंबंध ठीक करण्यासाठी लवकरच दोन्ही ही बोर्ड काहीतरी मार्ग शोधतील.”
मात्र, पाकिस्तान क्रिकेट बॉर्डचे चेअरमन एहसान मनी यांनी याबाबत अद्याप कुठलेही वक्तव्य केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
माजी भारतीय खेळाडू म्हणतो, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळायला हवी होती भारतीय संघात संधी, पण…