पुणे 21 नोव्हेंबर 2022: बाऊन्स टेनिस अकादमी, पीएमडीटीए आणि पुणे पॅरेंट्स यांच्या तर्फे आयोजित, टाटा महा ओपनच्या सहकार्याने व एआयटीए एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या टाटा महा ओपन अखिल भारतीय मानांकन 14 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात अदिती सागवेकर, सृष्टी सूर्यवंशी, मिशिका तायडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अदिती सागवेकर हिने आर्या पाठकचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(6) असा पराभव केला. चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशी हिने सारा फेंगसेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. सहाव्या मानांकित मिशिका तायडेने ओजसी देगमवारचा 5-7, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुली:
अदिती सागवेकर वि.वि.आर्या पाठक 6-2, 7-6(6);
मायरा टोप्नो वि.वि.श्रेया होनकन 6-2, 6-4;
मिशिका तायडे(6) वि.वि.ओजसी देगमवार 5-7, 6-1, 6-4;
तमन्ना नायर(8)वि.वि.अरोनिका साहा 6-3, 6-2;
काव्या देशमुख वि.वि. सानवी राजू 6-2, 6-0;
संयुक्ता पगारे वि.वि.समिक्षा औताडे 6-2, 6-2;
सृष्टी सूर्यवंशी(4) वि.वि.सारा फेंगसे 6-0, 6-2;
अस्मी टिळेकर वि.वि.रित्सा कोंडकर 6-2, 6-4;
ईशाल पठाण(2)वि.वि.आहाना पाटील 6-1, 6-2;
अवंतिका सैनी वि.वि.मनस्वी वाकोडे 6-1, 6-2;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA WORLD CUP: पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा धमाका; इराणचा 6-2 ने उडवला धुव्वा