अफगाणिस्तान संघाची फलंदाजी विश्वचषक 2023मध्ये चांगली दिलसी आहे. मंगळवारी (7 नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील 39वा सामना खेळला गेला. अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभी केली. सोबतच विश्वचषकात त्यांच्या फलंदाजाला पहिल्यांदाच शतकी खेळी करता आली.
अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज इब्राहिम जादरान (Ibrahim Zadran) याने 131 चेंडूत आफले पहिले विश्वचषक शतक ठोकले. हे केवळ इब्राहिमचे पहिले विश्वचषक ठरले नाही, तर अफगाणिस्तान संघाचे विश्वचषकातील पहिले शतक ठरले आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी देशासाठी ही मोठी कामगिरी केली, जी याआधी एकही अफगाणिस्तानी खेळाडू करू शकला नव्हता.
मागच्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तान संघाचे फलंदाज अप्रतिम खेळी करत आहेत. अनेकजण अफगाणिस्तानच्या फलंदाजीमागे भारतीय दिग्गज अजय जडेजा यांचा हात असल्याचे बोलत आहेत. जडेजा यांना ठिक विश्वचषक 2023 सुरू होण्याआधी अफगाणिस्तानच्या मेंटॉरपदी नियुक्त केले गेले गेले आहे. विश्वचषकात अनेकदा ते अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसले आहेत. (A historic moment, whole Wankhede rises up for 21-year-old Ibrahim Zadran.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
महत्वाच्या बातम्या –
ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी 3 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, कोण आहे तो नशीबवान भारतीय?
वानखेडेवर अफगाणी कर्णधाराने जिंकला टॉस, करणार पहिली बॅटिंग; कमिन्ससेनेतून 2 हुकमी एक्के बाहेर