श्रीलंका येथे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेत पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. यातील दुसरा सामना खूपच रंजक पद्धतीने पार पडला. सामन्याचा निकाल अखेरच्या षटकात लागला. पाकिस्तानने हा सामना 1 विकेटने जिंकला. या विजयाचा हिरो नसीम शाह ठरला. त्याने सामन्यात महत्त्वाच्या क्षणी चौकार मारून संघाला विजयी केले. या विजयानंतर नसीम शाह भावूक झाला. नसीम शाहला आईची आठवण झाली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तान संघाला विजयी करून नसीम भावूक
अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिल्यानंतर नसीम शाह (Naseem Shah) खूपच भावूक दिसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत क्रिकेटपटू नसीम शाह भावूक (Naseem Shah Emotional) झाल्याचे दिसत आहे. तो सामना जिंकल्यानंतर आपल्या आईची आठवण काढताना दिसला.
पीसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओत नसीम म्हणाला की, “आज माझी आई पाहू शकली असती. मी आता काहीच बोलू शकत नाहीये.” नसीमचा हा व्हिडिओ चाहत्यांनाही भावूक करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CwXRC05MNkt/?utm_source=ig_embed&ig_rid=f0e85472-0b1d-4b93-8f9b-365513280ab1
सामन्याचा आढावा
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान (Afghanistan vs Pakistan) संघातील दुसरा वनडे सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 300 धावा चोपल्या होत्या. अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने 151 धावांची झंझावाती खेळी साकारली होती. मात्र, ही खेळी करूनही अफगाणिस्तानला विजय मिळवता आला नाही.
पाकिस्तानने 301 धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यांनी 49.5 षटकात 302 धावा करून 1 विकेटने विजय मिळवला. पाकिस्तानकडून इमाम उल हकने 91, कर्णधार बाबर आझमने 53 आणि शादाब खानने 48 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकत मालिकाही खिशात घातली. (afg vs pak cricketer naseem shah got emotional after match winning knock against afghanistan see video)
हेही वाचा-
बीसीसीआयचा खिसा भरणार गच्च! टीम इंडियाला मिळाला नवीन टायटल स्पॉन्सर, 3 वर्षांमध्ये छापणार ‘एवढा’ पैसा
नेपाळ संघाला हलक्यात घेऊच नका, बलाढ्य संघांना दिलाय धोबीपछाड, टीम इंडियाला राहावे लागेल सावधान!